मानोरा (Washim):- तालुक्यात रेशन धान्य वाटप करण्यासाठी शासनाने उपलब्ध करून देण्यात आलेली ई – पॉस मशिनमध्ये (E-POS Machine) वारंवार तांत्रिक समस्या उदभवत असल्यामुळे रेशन धान्य वाटप खोळंबले असुन यामुळे ग्राहकासह रेशन दुकानदार त्रस्त झाले आहे. धान्य वितरण व्यवस्था मशिन अभावी खोळंबली असल्यामुळे ग्राहक व दुकानदार यांच्यामध्ये खटके उडत आहे.
ई – पॉस मशिनमध्ये वारंवार तांत्रिक समस्या
शासनाने मागील काही वर्षांपासून धान्य भ्रष्टाचाराला (Corruption) आळा बसावा यासाठी रेशन वितरण करण्यासाठी रास्त भाव दुकानदाराना ऑनलाईन धान्य वाटप करण्यासाठी ई-पॉस मशिन उपलब्ध करून दिली आहे. सदरील मशीनचा ठेका एका कंपनीकडे शासनाने दिला आहे. या मशीमध्ये वर्जन, निक वर विविध तांत्रिक अडचणी निर्माण होत आहे. त्यामुळे कधी मशिन कासवगतीने हळू तर कधी कोणतीही समस्या उदभवत असल्याने धान्य वाटप वितरण व्यवस्थेत अडथळा निर्माण होत आहे. तालुक्यात १२० रास्त भाव दुकाने आहेत. धान्य ऑनलाईन (online) वाटप करावयाचे असल्याने माहे ऑगस्टचे रेघुलर धान्य वाटप ई – पॉस मशिनच्या तांत्रिक अडचणीमुळे रखडले आहे.