आदित्य ठाकरे यांची मागणी
परभणी/पाथरी (Aditya Thackeray) : “मी इथे तू तू मै मै करणार नाही” कृषिमंत्र्यांनी व मुख्यमंत्र्यांनी आता जी काय मदत द्यायची आहे, ती जाहीर करावी .शेतकऱ्यांसाठी जी मदत आम्हाला पाहिजे ती दौऱ्याच्या शेवटी सांगणारच आहोत. मुख्यमंत्र्यांचा घटनाबाह्य मुख्यमंत्री असा उल्लेख करत मुख्यमंत्र्यांनी एकरी मदत घोषित करावी व विमा कंपन्यांना आजच बोलावून घेत 24 तासात विम्याचे पैसे वितरित करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी पाथरी तालुक्यातील बोरगव्हाण येथे माध्यमांशी बोलताना केली आहे.
विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, खासदार संजय राऊत यांच्या सोबत नुकसानीची केली पाहणी
अतिवृष्टी झाल्यानंतर मराठवाडा दौऱ्यावर आलेले आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) बुधवार 4 सप्टेंबर रोजी दुपारी तालुक्यातील बोरगव्हाण येथे शेती नुकसानीचची पाहणी करण्यासाठी आले होते. यावेळी त्यांच्यासोबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खा. संजय राऊत , खा. संजय जाधव, आ. राहुल पाटील , माजी आ. बाबाजानी दुर्राणी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) माध्यमांशी बोलतांना आदित्य ठाकरे यांना शेतीतले काय कळते ? असे म्हणाले आहेत असे विचारले असता (Aditya Thackeray) ठाकरे म्हणाले की, मला शेतीतले बिलकुल कळत नाही परंतु एवढं कळतं की आज माझा शेतकरी बांधव हैराण, त्रस्त आहे आणि त्याच्या मदतीला आम्ही धावले पाहिजे. बाकी मला शेती नाही कळत पण कृषी खात्यात कशा बदल्या होतात ते त्यांना जास्त माहितीये मला कुठे माहिती आहे असा टोमणा कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना मारला.
तालुक्यातील बोरगव्हाण येथे दिली भेट
दरम्यान यावेळी स्थानिक शेतकऱ्यांनी त्यांच्याशी संवाद साधला. कृषिमंत्र्यांनी बुधवारी बोरगव्हाण येथे भेट दिल्यानंतर शेतकऱ्यांशी ते व्यवस्थित बोलले नाहीत अशी तक्रार स्थानिक शेतकऱ्यांनी आदित्य ठाकरे यांच्या कानावर घातली. पीक पाहणी दरम्यान अनेकांनी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना निवेदन दिली.