आ. मेघनाताई बोर्डीकर यांच्याहस्ते वितरण
परभणी/सेलू (Household material) : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाच्या वतीने सेलू तालुक्यातील ३ हजार बांधकाम कामगारांना संसारोपयोगी साहित्य संचाचे वाटप आ. मेघनाताई बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आले.
इमारत व बांधकाम कामगार मंडळाचा उपक्रम
भाकरीचा प्रश्न सोडविण्यासाठी अहोरात्र परिश्रम करणारे बांधकाम कामगार जीव मुठीत ठेऊन काम करतात. कामगारांना संसार उपयोगी साहित्य मिळाले पाहिजे, या भावनेतून महाराष्ट्र इमारत व बांधकाम कल्याणकारी मंडळांनी ही योजना हाती घेतली आहे. त्या योजनेनुसार सेलु तालुक्यातील ३००० कामगारांना गृहपयोगी साहित्य संच वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष डॉ. संजय रोडगे हे होते. यावेळी तालुकाध्षक्ष दत्ता कदम, शहराध्यक्ष अशोक अंभोरे, प्रकाश गोरे, कपील फुलारी, अजय डासाळकर, गणेश काटकर, संदीप बोकान, बाळासाहेब काजळे, दत्ता तांबे, शिवहारी शेवाळे, भागवत दळवी, जयसिंग शेळके, कृष्णा मगर, अमोल मोगल, अर्जुन बोरूळ, गुड्डु दिक्षीत, प्रकाश शेरे, जोगदंड महाराज, दत्ता पवार, प्रकाश शेरे, शिवम गटकळ आदीसह भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
७०० जेष्ठ नागरीकांना आ. मेघनाताई बोर्डीकर यांच्या हस्ते साहित्याचे वाटप
जिंतूर : केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अस्थिव्यंगाकरिता मंत्रालयाच्या राष्ट्रीय वयोश्री योजनेद्वारे आ. मेघनाताई बोर्डीकर यांनी ७०० लाभार्थ्यांना लाभ मिळवून दिला आहे. शहरी व ग्रामीण भागातील दिव्यांगांना व ज्येष्ठ नागरिकांना गरजेनुसार तीन चाकी सायकल,व्हील चेअर, मोटारइज्ड ट्रायसायकल, कॅलिपर्स, कुबड्या, कृत्रीम हात-पाय, श्रवणयंत्रे, विविध प्रकारच्या काठया, ब्रेल कीटस्, एम.आर.किटस्, नंबरचा चष्मा, स्मार्ट फोन इत्यादी कृत्रीम अंग व साधनांचे वाटप आले.याप्रसंगी भाजपाचे तालुकाध्यक्ष विनोद राठोड, के.डी.गोटे, बेहेरा, बिनेशकुमार शर्मा, संजय मंडल, जि.प. समाजकल्याण विभागाचे लांडे, डॉ.पंडीत दराडे, कासाबाई बुधवंत, संगिता जाधव, भानुदास वाळके, दत्ता कटारे,माधव दराडे, विष्णु वैरागड आदी उपस्थित होते.