औंढा नागनाथ मंदिर परिसरातील भक्तनिवास बांधकामाची परिसराची केली पाहणी
औंढा नागनाथ/हिंगोली (Collector Abhinav Goyal) : देशातील आठव्या स्थानावर असलेल्या ज्योतिर्लिंग नागनाथ प्रभुचे हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी २ सप्टेंबरला सपत्नीक महापूजा केली. महापूजेनंतर देवस्थानचे अध्यक्ष तथा तहसीलदार हरीश गाडे यांनी नागनाथ मंदिराची प्रतिमा देऊन (Collector Abhinav Goyal) जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांचा सत्कार केला. जिल्हाधिकारी गोयल यांनी नागनाथ मंदिर परिसराचे पाहणी केली तसेच नागनाथ मंदिराच्या पश्चिम दिशेला भक्तनिवास बांधकाम होत आहे.
सा.बा. विभागाच्या अधिकाऱ्याला धरले धारेवर
या बांधकामाची देखील पाहणी करून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले बांधकाम हे निकृष्ट दर्जाचे होता कामा नये असे देखील खडसावले. तहसीलदार हरीश गाडे, ,कंलटेवाड उपविभागीय अभियंता , देवस्थानच्या अधीक्षक वैजनाथ पवार व्यवस्थापक सुरेंद्र डफळ , मंडळ अधिकारी आशा गिते नितीश कुलकर्णी विनोद साळवे यावेळी उपस्थित होते.