घोषणा ते निवडणूक निकाल जाहीर होण्यापर्यंतच्या प्रत्येक टप्प्याचे सूक्ष्म नियोजन करावे- जिल्हाधिकारी अभिनव गोयल
हिंगोली (Vidhan Sabha Elections) : आगामी विधानसभा निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व नोडल अधिकारी यांनी (Vidhan Sabha Elections) निवडणुकीच्या घोषणेपासून ते मतदानाचा निकाल जाहीर करण्यापर्यंत प्रत्येक टप्प्यावरील कार्यवाहीचे सूक्ष्म नियोजन करावे. निवडणूक कामाला प्राधान्य देऊन यामध्ये कोणताही हलगर्जीपणा होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव (Collector Abhinav Goyal) यांनी दिल्या.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Vidhan Sabha Elections) पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज जिल्हास्तरीय नोडल अधिकारी यांच्या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी गोयल बोलत होते. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे, उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड, मंजुषा मुथा, जिल्हा पुरवठा अधिकारी राजेश पुंजाल, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक आदित्य पवार, जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजू एडके, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी जगदीश माने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता डी. जी. पोत्रे, प्रशिक्षणाचे नोडल अधिकारी दीपक साबळे यांच्यासह सर्व जिल्हास्तरीय नोडल अधिकारी यावेळी उपस्थित होते.
आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रत्येक (Vidhan Sabha Elections) विधानसभा मतदारसंघात व्यापक मतदार जनजागृती मोहीम राबविणे आवश्यक आहे. विशेषतः गत लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी कमी असलेल्या गावात, मतदान केंद्रावरील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबवावेत. नवीन मतदान केंद्रांची निर्मितीमुळे किंवा इतर काही कारणांमुळे मतदान केंद्रामध्ये बदल झाला असल्यास त्या मतदान केंद्रावरील मतदारांना याबाबत माहिती द्यावी. यासाठी ग्रामसेवक, तलाठी, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यावर जबाबदारी द्यावी. मतदान केंद्रांवर किमान आवश्यक सुविधांची उपलब्धता करून देण्याबाबत आतापासूनच पूर्वतयारी करून ठेवण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी गोयल (Collector Abhinav Goyal) यांनी दिल्या.
विधानसभा निवडणूक (Vidhan Sabha Elections) प्रक्रिया शांततामय आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी प्रत्येकाने आपल्यावर सोपविलेली जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडावी. सर्व नोडल अधिकाऱ्यांनी विधानसभानिहाय आढावा बैठका आणि प्रशिक्षण घेऊन निवडणूकविषयक कामांची माहिती द्यावी. तसेच त्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे. निवडणूक कामामध्ये कोणत्याही प्रकारची दिरंगाई अथवा हलगर्जीपणा झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर कठोर कार्यवाही केली जाईल, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. प्रारंभी उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे यांनी जिल्हास्तरावरून करण्यात येत असलेल्या कार्यवाहीबाबत माहिती दिली व मतदानासाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांच्या प्रशिक्षणाबाबत मार्गदर्शन केले.