शुभेच्छा स्वीकारत सर्वांशी साजरा संवाद; प्रेम पाहून भारावले!
– राजेंद्र काळे
नवी दिल्ली (MP Mukul Wasnik birthday) : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव तथा राज्यसभा खासदार मुकुल वासनिक (MP Mukul Wasnik) यांचा 27 सप्टेंबर हा वाढदिवस, यादिवशी बुलढाणा जिल्ह्यातील काँग्रेसचेच (District Congress) नव्हेतर त्यांच्याशी संबंधित असलेल्या विविध पक्षातील नेत्यांनी त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी येऊन त्यांना पुष्पगुच्छ व काही भेटवस्तू देत शुभेच्छा दिल्या. या सर्व शुभेच्छांचा स्वीकार करून, बुलढाणा जिल्ह्यावासी यांचे प्रेम पाहून भारावलो असल्याच्या भावना यावेळी खा. वासनिक (MP Mukul Wasnik) यांनी व्यक्त केल्या.
खा. मुकुल वासनिक (MP Mukul Wasnik) यांचा वाढदिवस हा बुलढाणा जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांसाठी उत्साहाची पर्वणी असते, (District Congress) जिल्हाभर काँग्रेसच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजनतर सुरूच असतात पण अनेक नेते व पदाधिकारी दिल्लीत येऊन त्यांना शुभेच्छा देतात. यावर्षी लोणार येथे मुकुल वासनिक यांनी त्यांच्या कॅमेऱ्यातून टिपलेल्या वाइल्ड फोटोग्राफीचे प्रदर्शन विजय अंभोरे यांच्या माध्यमातून भरविण्यात आले आहे, विशेष म्हणजे प्रदर्शनाच्या समारोपासाठी खा. वासनिक प्रत्यक्ष येणार आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष संजय राठोड हे त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह नवी दिल्ली येथे पोहोचले होते. यावेळी त्यांच्या वतीने सामूहिक अभिष्टचिंतनाचा सोहळा झाला. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल बोंद्रे व वृषाली बोंद्रे, आ. राजेश एकडे, आ. धीरज लिंगाडे, डॉ. अरविंद कोंलते, सुनील शेळके यांनी पूर्वसंध्येलाच शुभेच्छा दिल्या. तर हर्षवर्धन सपकाळ, दिलीपकुमार सानंदा, बबनराव चौधरी, मेहकर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष देवानंद पवार, श्यामबाबू ऊमाळकर, राम डहाके, अंकुशराव वाघ, सचिन बोंद्रे, रामविजय बुरुंगले, दादू शेठ, लक्ष्मणराव घुमरे, नंदू बोरे, वसंतराव देशमुख, विनोद बेंडवाल, ॲड. गणेशसिंग राजपूत संतोष जाधव, श्री ढगे, तेजेंद्रसिंह चव्हाण, इरफान पठाण, रफिक शेख, गजेंद्र माने, जयदीप देशमुख, बाळू ससाने, जयदीप बुरुंगले, राजेंद्र गायकवाड यांच्यासह शिवसेना संपर्कप्रमुख प्रा. दादासाहेब खेडेकर व माजी आमदार धुपदराव सावळे यांनीही येऊन वाचनेकांना शुभेच्छा दिल्या.