जिल्हा सामान्य रुग्णालयात उभारणार अत्याधुनिक कर्डियाक केअर युनिट व कॅथलॅब
बुलढाणा (District general hospital) : शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी वैद्यकीय क्षेत्रात क्रांतिकारी पाऊल ठेवत त्यांच्या प्रयत्नाने बुलढाणा जिल्हा रुग्णालय (District general hospital) येथे महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत लवकरच अत्याधुनिक कार्डियाक केअर युनिट व कॅथलॅब उभारली जाणार आहे. याकरीता शासनाच्या वतीने तब्बल 15 कोटी रुपये उपलब्ध करण्यात आलेले आहे. या ठिकाणी बायपास व एन्जोप्लास्टी सारख्या सर्जरी गरीब रुग्णांना मोफत स्वरूपात उपलब्ध करून दिले जाणार आहे.
आ. संजय गायकवाड यांचे वैद्यकीय क्षेत्रात क्रांतिकारी पाऊल
सदर इमारतीचे भूमिपूजन 14 जुलै रोजी सकाळी 10 वाजता जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात करण्यात आले. बुलढाणा विधानसभा मतदारसंघ नव्हे तर जिल्हाभरातील शेकडो गरीब मजूर शेतकरी उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय धाव घेत असतात मात्र या ठिकाणी मागील अनेक वर्षांपासून कार्डिया सुविधा उपलब्ध नसल्याने रुग्णांना उपचारासाठी पुणे नागपूर हैदराबाद मुंबई यासारख्या मोठ्या (District general hospital) शहरातील खाजगी रुग्णालयात आधार घ्यावा लागत होता त्यामुळे गरीब शेतकऱ्यांचा आर्थिक नुकसान होत होते. जिल्हा सामान्य रुग्णालयाचे सदस्य सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी मतदारसंघातील नागरिकांची होती. सदर विषयाचे गांभीर्य पाहता आ. संजय गायकवाड यांनी जिल्ह्याचे खासदार तसेच केंद्रीय आयुष्य आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव (Prataprav Jadhav) यांच्याशी या विषयावर चर्चा करून या विषयाचा पाठपुरावा केला.
शासनाच्या वतीने महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत सदर इमारती करिता 15 कोटी रुपयांचा निधी देखील खेचून आणला. (District general hospital) याठिकाणी उभे राहणाऱ्या कार्डिया केअर युनिटमध्ये हृदयाची संपूर्ण तपासणी केली जाणार असून या सोबतच अतिशय महागड्या असलेल्या इको, टीएमटी, इसीजी, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी सारख्या तपासण्या देखील केल्या जाणार आहेत. एवढेच नव्हेतर या ठिकाणी हृदय बायपास व एन्जोप्लास्टीसाठी आवश्यक असलेल्या अत्याधुनिक कार्डिया ऑपरेशन थिएटर इंत्रा आर्टिक बलून पंप मशीनसह खाद्य बायपास व हद्य शस्त्रक्रिया उपकरणे आणि साधने अनेक स्तेशिया उपकरणे सुसज्ज दहा बेडचे इंटेन्सिव्ह केअर युनिट कार्डिया उपकरणे आधी सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक भुसारी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पवनसिंग राजपूत, शहर प्रमुख गजेंद्र दांदडे, ज्येष्ठ शिवसैनिक व माजी नगराध्यक्ष विठ्ठल येवले, अजय बिलारी, स्वीय सहायक श्रीकृष्ण शिंदे, महिला पदाधिकारी तायडे, ठाकरे ताई, अर्जुन दांडगे, चिंटू परशे आदी उपस्थित होते.
10 महिन्यात उभी राहणार इमारत
या भूमिपूजनाप्रसंगी आ. संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी संबंधित कंत्राटदाराशी चर्चा करून माहिती घेतली यावर कंत्राटदाराने केवळ दहा महिन्यातच सदरची इमारत उभी करण्याचे सर्व समोर आश्वासन दिले, त्यामुळे पुढील एका वर्षातच सदर सर्व सुविधा नियुक्त असलेले (District general hospital) रुग्णालय बुलढाणा येथे उभे राहणार असल्याचे चित्र आहे.