तुमसर (Tumsar Hospital) : येथील उपजिल्हा रुग्णालयात (Tumsar Hospital) बाळंतपणासाठी दाखल झालेल्या महीलेच्या बाळंतपणानंतर चक्क स्त्री रोग तज्ञानी व संबधित डाॅक्टरानी नाॅर्मल प्रसुती झालेल्या बाळंतिन महीलेच्या गर्भपिशवीत कापड विसरल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा तुमसर उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा चव्हाट्यावर आला आहे. तर जिल्ह्यातील (medical field) वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
तुमसर उपजिल्हा रुग्णालयात प्रकार
उपजिल्हा रुग्णालय तुमसर (Tumsar Hospital) येथे तुमसर तालुक्यातील तामसवाडी येथील हिमानी हरिराम पांडे ही महिला पहिल्या खेप प्रसूती करिता उपजिल्हा रुग्णालय येथे २४ एप्रील ला दाखल झाली होती. दरम्यान २५ एप्रील ला तिची नॉर्मल प्रसूती झाली, नॉर्मल प्रसूती नंतर रक्तस्त्राव होऊ नये म्हणून कापड गर्भ पिशवी जवळ ठेवला जातो. तो कापड १२ ते २४ तासाच्या आत काढावा लागतो अशी माहिती, एका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. मात्र येथील स्त्री रोग व अन्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी चक्क बाळंतपण झाल्यानंतर गर्भ पिशवीजवळ लावलेला कापड न काढताच ओल्या बाळंतिणीला २७ तारखेला रुग्णालयातुन सुट्टी देण्यात आली. सदर महीला घरी गेल्यावर तिन -चार दिवसानी तिला असह्य वेदना होवु लागल्या. तिला स्वतः व घरात उग्र स्वरुपाचा वास येऊ लागल्याने महिला घाबरली. ती तत्काळ आपल्या नातेवाईकासोबत तुमसर येथील खाजगी रुग्णालय आली.
डाॅक्टराचा निष्काळजीपणा चव्हाट्यावर
दरम्यान, (Private Hospital) खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांनी तिची तपासणी केली. दरम्यान खाजगी डाॅक्टराना तिच्या गर्भाशयातच नार्मल बाळंतपणानंतरही चक्क कापड आढळून आल्याने संबधित बाळंतिण महीलेला व डाक्टराना एकच धक्का बसला. तो रक्ताने माखलेला कापड वेळीच उपचार करून काढण्यात आला. मात्र तो कापड २४ तासात काढणे गरजेचे असताना, सदर कापड ओल्या बाळंतिणीच्या गर्भाशयात आत मध्ये पूर्ण सडल्या अवस्थेत होता. दरम्यान बाळंतिण महिलेच्या शरिरात इन्फेकशन पसरला होता. परिणामी अशा वेळी संबधित बाळंतिणीला प्राणाला मुकावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधित (Tumsar Hospital) उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा,व बेजबाबदार पणा समोर आला आहे.
सदर प्रकार (Tumsar Hospital) उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकिय अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणाने घडल्याचे समोर आले आहे. येथील बाळंतिण महिलांच्या प्रसूती दरम्यान वैद्यकिय अधीक्षक, स्त्री रोग, तज्ञ, लहान मुलांचे डॉक्टर, भुलतज्ञ वेळेवर हजर राहत नसल्याने असे प्रकार घडत आहेत. येथील अधिपरिचारीकेच्या जबाबदारीवर येथे संबधित महीलांची प्रसूती केली जाते. येथील वैद्यकिय अधिक्षकावर जिल्हा शल्यचिकित्सकाचा तर आशीर्वाद नसावा? याकडे जिल्हा प्रशासन लक्ष घालून संबधित दोषी वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी बाळंतिण महीलेच्या पतीने केली आहे. सदर महीलेच्या बाळंतपणाची येथिल कर्मचाऱ्यां मार्फत माहीती काढली आहे. सदर प्रकरणाची योग्य ती चौकशी करुन पुढील कारवाई करण्यात येईल.
– नितिन मिसुरकर, प्रभारी वैद्यकीय अधिक्षक, उपजिल्हा रुग्णालय तुमसर.