Yawatmal :- भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश मा. भूषण गवई यांच्यावर भ्याड हल्ला करण्याचा प्रयत्न एका वरिष्ठ वकिलाने केल्याचा प्रकार सोमवारी ६ ऑक्टोबर रोजी घडला होता. या घटनेनंतर देशभरातून हल्ल्याचा निषेध (Prohibition) व्यक्त केला जात असून यवतमाळ मध्ये येथील यवतमाळ जिल्हा वकील संघाच्या वतीने काम बंद करीत तीव्र निषेध व्यक्त केला.
भूषण गवळी यांच्यावर सर्वोच्च न्यायालयात भ्याड हल्ला करण्याचा प्रयत्न
भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे (Supreme Court) सरन्यायाधीश भूषण गवळी यांच्यावर सर्वोच्च न्यायालयात भ्याड हल्ला करण्याचा प्रयत्न एका वरिष्ठ वकिलातर्फे करण्यात आला. ही गंभीर घटना घडल्याने देशभरातून या गंभीर घटनेचा निषेध व्यक्त केला जात आहे. अशातच बार कौन्सिलिंग ऑफ महाराष्ट्र ?न्ड गोवा आणि देशातील विविध राज्य बार असोसिएशनने या हल्ल्याचा निषेध दर्शविण्यात आला. असून ७ ऑक्टोंबर रोजी यवतमाळ जिल्हा वकील संघाने ठराव घेऊन भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा निषेध म्हणून बुधवारी ८ ऑक्टोबर रोजी यवतमाळ जिल्हा वकील संघाने कामापासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला असून या हल्ल्याचा प्रयत्न म्हणजेच न्यायव्यवस्थेवर हल्ला आहे.
त्यामुळे या घटनेचा यवतमाळ बार असोसिएशनच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष अँड संजय जैन, अँड मोहन गिरटकर, अँड मनमोहन ठाकरे, अँड शाहरुख सय्यद, अँड अभिलाष पाटील, अँड जयसिंग चव्हाण, अँड रंजीत आगामे, यांच्यासह अनेकांनी काम बंद आंदोलनात सहभाग घेतला होता.




