वेबसाइटचा लोकार्पण सोहळा संपन्न
नागपुर (Lawyers Day) : जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर येथे जिल्हा वकील संघटनेच्या वतीने जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर येथील सभागृहात वकील दिनानिमित्य वकीली व्यवसायायात ५० वर्ष पूर्ण झालेल्या वकील बांधवाचा सत्कार सोहळा व जिल्हा वकील संघटनेच्या वेबसाइटचा लोकार्पण सोहळा संपन्न सोहळा संपन्न झाला. सदर कार्यक्रमास अध्यक्ष तथा प्रमुख मार्गदर्शक म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती श्री. नितीन सांबरे हे उपस्थित होते तर विचारमंचावर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री.डी.पी. सुराणा यांचेसह जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष अॅड. रोशन बागडे, महासचिव अॅड. मनिष रणदीवे हे उपस्थित होते.
मा. न्यायमूर्ती श्री. नितीन सांबरे यांनी यावेळी वकीली व्यवसायातील चढउतारावर भाष्य करीत आपल्या वकीली जीवनातील अनेक आठवनींना उजाळा दिला. वकीली क्षेत्र हे रोज काहीतरी नवीन शिकण्याचे क्षेत्र आहे असे ते म्हणाले आणि डीबीएचा वेबसाइट लोकार्पणासह सत्कार सोहळा हा स्तुत्य उपक्रम आहे असे मत व्यक्त केले.
सदर (Lawyers Day) कार्यक्रमात अॅड.एम. एल. सोमलवार, अॅड.महेश गुप्ता, अॅड. दयाराम लालवानी, अॅड.भैया पोंगडे, अॅड. प्रभाकर ढोक, अॅड. प्रकाश कोठारी, अॅड.अनिल मोहरील, अॅड.मोहन समेळ, अॅड. मोहम्मद इस्माइल मोहम्मद इकबाल, अॅड.मारुती गडकरी, अॅड. अशोक रणदिवे, अॅड.श्रीमती. कुमकुम शिरपुरकर, अॅड. आनंदकुमार हिरानी, अॅड.एस. सी. मेहाडीया, अॅड. अविनाशकुमार गुप्ता, अॅड.जयंत बुटी, अॅड. सत्यनारायण धूत, अॅड.दिनकर खाटी, अॅड.विजय चांडक, अॅड.क्रिष्णा दाढे, अॅड.विनय देव, अॅड.दत्तात्रय दुबे, अॅड. आनंदराव गिरडकर, अॅड. ओंकारदास जैन, अॅड. विष्णु लघाटे, अॅड.सुरेश झांगीयानी इत्यादी मान्यवर वकिलांचा वकीली व्यवसायात मागील ५० वर्षात दिलेल्या योगदनाबद्दल कृतज्ञातापूर्वक सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या (Lawyers Day) यशस्वीतेसाठी अॅड. आशीष नागपूरे, अॅड. संदीप बावणगडे, अॅड. वासुदेव कापसे, अॅड.मनोज मेंढे, ॲड श्रीकांत गावंडे, अॅड श्रीकांत येडलेवार, अॅड. सौरभ पोद्दार, अॅड. राजेश मानमोडे, अॅड. तेजस दाढे यांचेसह डीबीएच्या कार्यकारिणीने परिश्रम घेतले, सूत्रसंचालन अॅड. उषा गुजर यांनी केले तर आभारप्रदर्शन अॅड. अक्षज बागडे यांनी केले.