परतवाडा (Thang-Ta Martial Arts) : परतवाडा थांग-ता क्लब व अखील महाराष्ट्र लष्कर शास्त्रादी विविध शिक्षण प्रसार मंडळ अमरावती तर्फे आयोजित २७ वी जिल्हास्तरिय थांग-ता स्पर्धा स्थानिक वाघामाता संस्थान येथील राम शेवाळकर सभागृहात दी.११ आॅगष्ट रोजी उत्साहात संपन्न झाली.स्पर्धेच्या उद्घाटनाला अमरावती जिल्हा शाररीक शिक्षण समीती अध्यक्ष श्री प्रदीप खडसे सर ,महाराष्ट्र थांग-ता असोसिएशन चे सचिव श्री.महाविर धुळधर सर , अम.जिल्हा थांग -ता चे श्री.सतिश गवई सर, क्रीडा शिक्षक श्री.रामदास जसेकर, एएमटीटीए चे सदस्य श्री.मनिष जहागिरदार तसेच वाघामाता संस्थान चे अध्यक्ष श्री अरूणजी दिक्षित, व वाघामाता संस्थान चे जेष्ठ सदस्य श्री.मिश्रा गुरुजी या मान्यवराची उपस्थीती होती. या जिल्हा स्तरावरील स्पर्धेत जिल्ह्यातील विविध शाळेतील अंदाजे २०० च्या जवळपास खेळाडू सहभागी झाले होते. थांग-ता हा खेळ भारतीय पारंपरिक युद्धकला असून हा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर हा खेळ खेळला जातो, खेलो इंडिया साठी जिल्हा स्तर स्पर्धा हे एक पुढच पाऊल आहे.
थांग -ता खेळाला महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन, इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन, स्कुल गेम फेडेरेशन ऑफ इंडिया, खेलो इंडिया, एक भारत श्रेष्ठ भारत,मान्यता प्राप्त खेळ आहे, व आगामी होणाऱ्या नॅशनल गेम्स मध्ये सुद्धा थांग -ता खेळाचा समावेश असणार आहे. जिल्हा स्तर थांग -ता स्पर्धेत प्रविण्य प्राप्त खेळाडूंची निवड ही सेवाग्राम (वर्धा) येथे दिनांक 16 ते 18 ऑगस्ट रोजी होणाऱ्या 28 व्या राज्य स्तर थांग -ता क्रीडा स्पर्धा करिता करण्यात आली आहे, तरी सर्वत्र खेळाडूंचे कौतुक होत आहे.
निवड झालेल्या खेळाडूंना पुढील वाटचालीस शुभेच्छांचा वर्षाव सुरु झालेला आहे व पुढील राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होण्यास खेळाडूंची उत्सुकता वाढली आहे. तसेच अमरावती येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ येथील “खेलो इंडिया” सेंटर च्या थांग -ता खेळाडूंचीही निवड राज्य स्तर थांग -ता स्पर्धा करिता झालेली आहे. निवड झालेल्या खेळाडूंना ह.व्या.प्रसारक मंडळ अमरावतीचे पदमश्री श्री.प्रभाकररावजी वैद्य, सचिव माधुरी ताई चेंडके, अध्यक्ष, ऑल महाराष्ट्र थांग-ता असोसिएशन श्री मुकुंद धुळधर, श्री.श्रीकांत चेंडके अ.जि.थांग-ता असो चे श्री.राजेश महात्मे सर ,थांग-ता मार्शल आर्ट महाराष्ट्र हेड कोच सौ रुपाली जहागीरदार यांनी शुभेच्छा दील्या असून निवड झालेल्या खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.