हिंगोली (Abdul Sattar) : राज्याचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, पणन मंत्री तथा हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) हे उद्या शुक्रवार 20 जून रोजी हिंगोली दौऱ्यावर येत आहेत. यानिमित्त शुक्रवार, 21 जून रोजी सकाळी 11.45 वाजता शासकीय विश्रामगृह, हिंगोली येथून वाहनाने जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या उपस्थितीमध्ये दुपारी 12 वाजता जिल्हा नियोजन समिती सभा पार पडणार आहे. यानंतर दुपारी 1 वाजता खरीप हंगाम, पाणी टंचाई, पर्जन्यमान, दुष्काळाबाबतच्या बैठकीस त्यांची उपस्थिती राहणार आहे. दुपारी 2 वाजता शासकीय विश्रामगृह, (Hingoli City Council) हिंगोली येथे राखीव असून त्यानंतर हिंगोली येथून वाहनाने सिल्लोडकडे प्रयाण करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे.