हिंगोली (District Traffic Action) : जिल्ह्यात अनेक चालक बेशिस्तपणे रस्त्यात वाहने उभे करून वाहतुकीस अडथळा निर्माण करीत असल्याने त्यांच्यावर कारवाईचा धडाका सुरूच आहे.
वसमत येथे अब्दूल फेरोज अब्दूल खदीर याने ऑटो क्रमांक एम.एच.२६-जी.५१५३, वसमत बसस्थानकासमोर शेख चाँद शेख पाशा रसूल रा.मंगळवारा पेठ वसमत याने ऑटो क्रमांक एम.एच.२६-डब्ल्यू.४९९४, वसमत तालुक्यातील बाभुळगाव फाटा येथे वैजनाथ सुरेश राठोड र.बाभुळगाव याने रिअर ऑटो क्रमांक एम.एच.२२-यु.२६६९, बळीराम पांडूरंग गवंदे रा.वाखारी याने रिअर ऑटो क्रमांक एम.एच.३८-३९१२, वसमत ते वाखारी रस्त्यावर कारखाना फाटा येथे उमाज सखाराम हंबर्डे रा.हिवरा बु.जि.परभणी याने रिअर ऑटो क्रमांक एम.एच.२२-ए.व्ही.१३९५, हिंगोली ते परभणी रस्त्यावर आडगाव बसस्थानका समोर मुंजाजी रावसाहेब रोकडे रा.हट्टा याने महिंद्रा मॅक्स जीप क्रमांक एम.एच.२६-एल.०७०१, राहूल बळीराम जाधव रा.जवळा याने ऑटो क्रमांक एम.एच.२२-यु.००४८, विशाल विलासराव चव्हाण रा.आडगाव याने ऑटो क्रमांक एम.एच.३८-३६७२, जिंतूर टी-पॉईंट येथे शेख सत्तार शेख निजाम रा.रतननगर वसमत याने रिअर ऑटो क्रमांक एम.एच.३८-डब्ल्यू.०३७५ ही वाहने रस्त्याच्या मध्यभागी उभे करून येणार्या-जाणार्या वाहनास व लोकांच्या जीवित्वास धोका निर्माण केलेल्या अवस्थेत मिळून आल्याने चालकावर पोलीस ठाण्यात कारवाई करण्यात आली.
पोलीस निरीक्षक पाडळकरांनी चालकांना केले मार्गदर्शन
हिंगोली शहरामध्ये (District Traffic Action) अनेक रस्त्यावर ऑटो चालकावर मर्जी प्रमाणे वाहने उभी करीत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन कधी कधी अपघाताच्या घटना घडतात. त्यामुळे वाद निर्माण होऊन हे प्रकरण पोलिसांपर्यंत जाते. अशा घटना टाळण्याकरीता हिंगोली शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक नरेंद्र पाडळकर यांनी ५ डिसेंबर रोजी महात्मा गांधी चौकामध्ये जाऊन तेथील ऑटो चालकांना रस्त्यात वाहने उभी करू नयेत तसेच ड्रेसकोड नियमाचे पालन करावे, वाहन चालविताना वाहन परवाना यासह वाहनाचे कागदपत्र सोबत बाळगावे अशा अनेक सूचना दिल्या. ज्या चालकाने सुचनांकडे दुर्लक्ष केल्यास त्याच्यावर कारवाईचा बडगा उपसला जाईल असा इशाराही पोलीस निरीक्षक पाडळकर यांनी दिला आहे.