मुंबई/नागपूर (Maharashtra Cabinet) : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) आणि अजित पवार यांच्या महायुती मंत्रिमंडळात खातेवाटप करण्यात आले. नव्या वाटपांतर्गत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त आणि नियोजन, उत्पादन शुल्क खाते तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्याकडे गृहखाते आहे. याशिवाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्याकडे अन्य खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांना कॅबिनेट मंत्री करण्यात आले आहे. (Maharashtra Cabinet) नागपुरातील कामठी येथून त्यांनी निवडणूक जिंकली. याआधी ते एमएलसी होते. बावनकुळे तीन दशकांपासून भाजपमध्ये आहेत. 2014 ते 2019 या काळात ते मंत्री होते.
Maharashtra Portfolio Allocation | CM Devendra Fadnavis gets Home Ministry; Law & Judiciary
Deputy CM Eknath Shinde gets Urban Development & Housing and Public Works.
Deputy CM Ajit Pawar gets Finance & Planning and Excise dept pic.twitter.com/49EzXijvkd
— ANI (@ANI) December 21, 2024
धनंजय मुंडे यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा, अशोक उईके यांच्याकडे आदिवासी विकास, आशिष शेलार यांच्याकडे माहिती तंत्रज्ञान व संस्कृती खाते आहे. उदय सामंत यांना उद्योग, पंकजा मुंडे यांना पर्यावरण, माणिकराव कोकाटे यांना कृषी खाते आणि चंद्रकांत पाटील यांना उच्च व तंत्रशिक्षण खाते देण्यात आले आहे. गणेश नाईक यांना वन, दादा भुसे यांना शालेय शिक्षण खाते मिळाले. याशिवाय (Maharashtra Cabinet) बावनकुळे यांच्याकडे महसूल, राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे जलसंपदा आणि हसन मुश्रीफ यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.
Maharashtra Portfolio Allocation | Pankaja Mude gets the charge of Environment, Climate Change & Animal husbandry pic.twitter.com/g4VejpmrVW
— ANI (@ANI) December 21, 2024
शिर्डीतून आठ वेळा आमदार राहिलेले भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील यांना मंत्री करण्यात आले आहे. तर (Maharashtra Cabinet) पुण्यातील कोथरूडमधून दोनदा आमदार निवडून आलेले भाजपचे चंद्रकांत पाटील हे पहिले आमदार होते. पाटील हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे निकटवर्तीय मानले जातात.