संत सुश्री अलकाश्रीजी करणार रेल्वेचे पुजन भाईजी दाखविणार संकल्प रेल्वे यात्रेला हिरवी झेंडी
बुलडाणा (Radheshyam Chandak Divya Sankalp) : सद्भावना सेवा समिती बुलडाणा द्वारा दिव्य संकल्प रेल्वे यात्रेचे दि. ०८ नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबर २०२४ पर्यंत आयोजन करण्यात आले असुन रेल्वेचे संपुर्ण बुकींग पुर्ण झाले आहे. संपुर्ण दहा दिवसाच्या यात्रेची विभीन्न समित्याद्वारे पुर्ण तयारी झालेली आहे. बुकींग पुर्ण झाल्यामुळे काही भक्तांना प्रतिक्षा यादीमध्ये नाईलाजाने घ्यावे लागत आहे. त्यांचीही व्यवस्था करण्याचा प्रयत्न करु असे उद्गार सद्भावना सेवा समितीचे अध्यक्ष राधेश्याम चांडक (Radheshyam Chandak) यांनी रेल्वे यात्रेच्या तयारीचा आढावा घेतांना काढले.
दि. ०८ नोव्हेंबरला सकाळी ९.०० वाजता दिव्य संकल्प रेल्वे यात्रेचे अकोला येथून संत सुश्री अलकाश्रीजी द्वारा पुजन करुन व भाईजीचे शुभहस्ते हिरवी झेंडी दाखवून प्रस्थान होईल. ०९ नोव्हेंबरला मथुरा वृंदावन दर्शन करुन रात्री विश्राम राहील, १० नोव्हेंबरला सायंकाळी अयोध्येसाठी प्रस्थान, दि. ११ नोव्हेंबरला अयोध्या आगमन, शरयु स्नान, दर्शन व विश्राम, दि. १२ नोव्हेंबरला सुंदरकाड पं.पु. संत सुश्री अलकाश्रीजी यांच्या मधुन वाणीतुन होईल. रात्री वाराणसी करीता प्रस्थान, दि. १३ नोव्हेंबरला वाराणसी दर्शन, रात्री गंगासागर करीता प्रस्थान, दि. १४ नोव्हेंबरला गंगासागर दर्शन, रात्री विश्रांती, दि. १५ नोव्हेंबरला जगन्नाथपुरीला प्रस्थान, दि. १६ नोव्हेंबर पुरी दर्शन करुन रात्री अकोला करीता प्रस्थान, दि. १७ नोव्हेंबरला अकोला येथे आगमन व समापन होईल. आधीच्या कार्यक्रमानुसार दि. १५ व १६ नोव्हेंबरला अयोध्या कार्यक्रम नियोजित होता परंतु देव दिवाळीच्या महाउत्सवामुळे वीस ते पंचवीस लाख भाविकांची उपस्थिती अयोध्येमध्ये राहणार आहे. गैरसोय टाळण्यासाठी हा बदल करण्यात आलेला आहे. यांची सर्व भाविक यात्रेकरूंनी नोंद घ्यावी, असे आवाहन राधेश्याम चांडक (Radheshyam Chandak) यांनी केले आहे.
सद्भावना सेवा समितीने गेल्या पंचवीस वर्षापासुन भव्य-दिव्य कार्यक्रम (Divya Sankalp) यशस्वी रित्या आपल्या सर्वांच्या सहकार्याने पार पाडले आहे. या रौप्यमहोत्सवी वर्षात दिव्य संकल्प रेल्वे यात्रेचे आयोजन आपल्या सर्वांच्या सहकार्याने सफल होईल यात शंका नाही , समिती तर्फे नाश्ता, दुपारचे भोजन, चहा, रात्रीचे भोजन, निवास व्यवस्था, वाहतूक व्यवस्था उत्तम राहणार आहे. त्यासाठी नागपूरचे मनमोहन मर्दा आणि बुलडाण्याचे चंपालाल शर्मा रेल्वेशी सतत संपर्कात आहेत. कोणत्याही भक्ताची गैरसोय होणार नाही याकडे विशेष लक्ष देण्यात येणार आहे. त्याकरीता संबंधित संपर्क दुरध्वनी क्रमांक देण्यात येईल अशी माहिती राधेश्याम चांडक (Radheshyam Chandak) यांनी दिली.
बुकींग पुर्ण करण्यासाठी डॉ. परमेश्वर लड्डा, सुशीलजी सारडा, हरीषजी मानधना, घनशाम बागडी, संतोष महेंद्र, संदीप केला, अशोक राठी, गोपाल राठी, संतोष गुडगीला, अशोक भाला, गणेश डागा, पवन चांडक, अजय भट्टड, केदार मानधना, पवन पनपालीया इत्यादींनी परिश्रम घेतले. समितीची एक चमू अयोध्या, वृंदावन येथील व्यवस्थेची पाहणी करुन आली सद्भावना सेवा समितीचे अध्यक्ष राधेश्याम चांडक, उपाध्यक्ष राजेश देशलहरा, चंपालाल शर्मा, प्रा. प्रकाशचंद्र पाठक, सुरेश गट्टाणी, मनिष शर्मा, तिलोकचंद चांडक, उमेश मुंदडा, विजय सावजी, सुभाष दर्डा इत्यादींनी यात्रा यशस्वी करण्यासाठी दिवस- रात्र तयारी करत आहेत. दहा दिवसाच्या पवित्र तिर्थयात्रेचा लाभ भविकांनी पदरात पाडून पुण्यार्जन करावे असे उद्गार सद्भावना सेवा समितीचे राधेश्याम चांडक (Radheshyam Chandak) यांनी काढले.