विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्यावतीने वृद्धांना दिवाळीची भेट!
मानोरा (Diwali Celebration) : मानोरा शहरातील सहारा वृध्दाश्रमात विश्व हिंदू परिषद बजरंग दल (Vishwa Hindu Parishad Bajrang Dal) शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी दि. २० ऑक्टोबर रोजी वृद्धांना कपड़े व फराळाचे वाटप (Snack Distribution) देऊन वृद्धासोबत दिवाळी साजरी केली.
वृद्धांच्या तब्येतीची केली पदाधिकाऱ्यांनी विचारपूस!
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सोमवारी सर्व विश्व हिंदू परिषद बजरंग दल सर्व शाखा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शहरातील मुंगसाजी नगर मानोरा येथील सहारा वृद्धाश्रमात फराळ व कपड्यांचे वाटप करून दिवाळी साजरी केली.
फराळ व कपड्यांचे वाटप करून दिवाळी साजरी!
यावेळी भाजपाचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य डॉ अरविंद यावलकर, विश्व हिंदू परिषद बजरंग दलचे पदाधिकारी करण राजपुत, राम हेडा, डॉ ललित हेडा, कृष्ण साखरकर, मयूर देशमुख, अतुल राऊत, धीरज परांडे, रुपेश जोशी, सचिन पडद्यान, यश माडवंडे, अमर येवले, आदेश आडवे, कृष्णा भिमटे, कृष्णा राठोड, प्रथमेश जाधव, करण राठोड, राजकुमार पवार, योगेश तन्मय, राहुल राठोड, मंगेश गवई , संतोष उगले, योगेश मस्के, योगेश राठोड, राम इंगळे, प्रतीक राठोड, सुजल चव्हाण, विवेक रत्नपारखी, शिवा पाटील, पवन सोडकी, आशिष सरगर, खंडू डांगे, अभी चव्हाण, मनप्रीत बावरी आदी पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.