परभणी (Parbhani):- दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर ट्रॅव्हल्स (Travels) चालकांकडून मोठ्या प्रमाणात भाडेवाढ केल्या जाते. या पार्श्वभूमीवर परभणी उपप्रादेशीक परिवहन अधिकारी आश्विनी स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवार २५ ऑक्टोबर रोजी ट्रॅव्हल्स चालकांची विशेष तपासणी मोहिम राबविण्यात आली.
परभणी उपप्रादेशीक परिवहन कार्यालयाकडून विशेष मोहिम
मोटार वाहन निरीक्षक सुळे, भागवत, डुकरे, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक स्वप्नील वाकळे, आकाश कांबळे, अर्जुन खिंद्रे यांच्या पथकाने ४० ट्रॅव्हल्स, बसची तपासणी केली. या तपासणीत दहा वाहनांना प्रतिवेदन देण्यात आले. तसेच बुकिंग यजंट कार्यालयांना भेट देत प्रवाशांकडून महामंडळाच्या तिकीट दरापेक्षा दिडपट एव्हढेच जास्त भाडे घ्यावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. परभणीतून पुणे, नागपुर, कोल्हापुर, सोलापुर या मार्गाबरोबर राज्याबाहेरही ट्रव्हल्स जातात. सणउत्सवामध्ये गावाकडे येणार्या प्रवाशांची संख्या वाढत असल्याने ट्रव्हल्स चालकांकडूनही तिकीटाचे दर मोठ्या प्रमाणात वाढविण्यात येतात.