औंढा नागनाथ (Aundhanagnath Puja) : येथील दीपावलीनिमित्त बारा ज्योतिर्लिंगापैकी आठवे ज्योतिर्लिंग असलेले येथील नागनाथ प्रभूची पिंड व विविध अभ्यासथानन करून नागनाथ देवास शस्त्र अर्पण विविध अलंकाराने सजवण्यात आले होते. दरवर्षी प्रमाणे ही या वर्षी नागनाथ देवाच्या डोक्यावर चांदीची गंगा व नाग रूपा बसवण्यात आला होता. मुख्य पुजारी हरिहर भोपी व किरण गोरे, नागेश्वर गुरव, कमलाकर भोपी यांनी केली यावेळी देवस्थानचे अध्यक्षक वैजनाथ पवार व्यवस्थापक सुरेंद्र डफळ नागनाथाचे कर्मचारी उपस्थित होते. दीपावलीनिमित्त (Aundhanagnath Puja) नागनाथ देवाचे भाविक भक्तांनी दर्शनासाठी गर्दी करून दर्शन घेतले. यावेळी पोलीस निरीक्षक जी.एस राहीरे पोलीस कर्मचाऱ्यांनी नागनाथ मंदिर परिसरात व शहरात बंदोबस्त ठेवला होता.