पं.स. सदस्य सौ. राठोड करणार दीपावलीच्या दिवशी आंदोलन
मानोरा (PM Gram Sadak Yojana) : प्रधान मंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत निकृष्ट व दर्जाहीन रस्ते बांधून ग्रामीण नागरिक व शासनाची फसवणूक करणारे कंत्राटदार व या विभागाचे प्रशासकीय अधिकारी यांचे पोहरादेवी येथील कार्यक्रमात (PM Gram Sadak Yojana) पंतप्रधान यांच्याकडून सन्मान करण्याची मागणी करुनही दखल न घेतल्याने भुली – फुलउमरी या ६ कि. मी. च्या रस्त्यावर उगलेल्या पळसाच्या झाडाच्या ठिकाणी विधीवत पूजा करून त्या रस्त्यावरच दिवाळी साजरी करण्याचा संकल्प पं. स. च्या सदस्या छाया राठोड यांनी केले आहे.
तिर्थक्षेत्र पोहरादेवी येथील कार्यक्रमास (PM Gram Sadak Yojana) पंतप्रधान ग्राम सडक योजनेचे कार्यकारी अभियंता देशमुख यांना आमंत्रित करून उपविभागीय अभियंता व शाखा अभियंता यांची प्रमुख उपस्थिती राहावी म्हणून त्यांना पण या आगळ्यावेगळ्या आंदोलनात सहभागी होण्याचे आमंत्रण देणार असल्याचे सौ. राठोड यांनी म्हटले आहे. विकासाच्या बाबतीत अनुशेष ग्रस्त असलेल्या मानोरा तालुक्यातील ग्रामीण नागरिकांना उत्कृष्ट पायाभूत सुविधा मिळाव्यात यासाठी पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत तालुक्यात निर्माण करण्यात आलेले ग्रामीण रस्ते भ्रष्टाचारामुळे काही वर्षातच रसातळाला जात आहेत.
भुली ते फुलउमरी या काही कि. मी. उपरोक्त योजनेअंतर्गत (PM Gram Sadak Yojana) बांधण्यात आलेल्या डांबरी रस्त्याच्या मधोमध चक्क पळसाचे झाड उगवल्याने संबंधित विभागाने रस्ता बांधकाम होते, वेळी कंत्राटदारांकडून गुणवत्तापूर्ण बांधकाम साहित्य वापरले की नाही याकडे पूर्णपणे डोळेझाक केल्याने या भागातील नागरिक व रस्ता बांधकामासाठी कोट्यावधी रुपयाची निधी देणारे शासन दोघांचीही मोठी फसगत झाली आहे.
तालुक्यातील प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत (PM Gram Sadak Yojana) बांधण्यात आलेले भूली ते फुलउमरी, आमदरी ते पाळोदी, कारखेडा ते यशवंत नगर हेच रस्ते निकृष्ट नसून बहुतांश रस्ते काही महिन्यातच लयास गेल्याने उपरोक्त योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या रस्त्यांची स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी सुद्धा उपरोक्त विभागाने दुर्लक्षिली असल्याने खड्डे युक्त रस्त्यांमुळे त्रस्त नागरिकांच्या वतीने पळसाचे झाड उगवलेल्या व नंतर ते झाड काढून टाकलेल्या ठिकाणी दीप प्रज्वलित करून दीपावली सण साजरा करणार असल्याची माहिती सौ. राठोड यांनी दिली.