मानोरा(Washim):- तालुक्यातील मौजे भुली येथील मुख्य काँक्रिट रस्ता ग्राम पंचायतचे ठराव व शासनाच्या इस्टीमेटनुसार(estimate) करण्यात यावे, अन्यथा २५ ऑगस्ट रोजी पासून आपल्या कार्यालयावर आमरण उपोषण आंदोलन करणार अश्या इशाऱ्याचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना दि. १२ ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress) पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष पंडीत जाधव यांच्यासह इतरांनी दिले आहे.
रस्ता हा काँक्रिटचा असुन त्यामध्ये ठेकेदाराकडून जुने डांबरी रस्त्याच्या वापर
निवेदनात नमूद केले आहे की, भुली येथील मुख्य रस्त्याचे काम ग्राम पंचायतचा ठराव व शासनाच्या इस्टीमेटला बगल देवून निकृष्ट दर्जाचे करण्यात येत आहे. सदर रस्ता हा काँक्रिटचा असुन त्यामध्ये ठेकेदाराकडून जुने डांबरी रस्त्याच्या (Road)वापर करण्यात येत आहे. सदर कामावर नेमणूक असलेल्या शाखा अभियंता विवेक पवार यांना वारंवार सांगूनही कोणत्याही प्रकारची चौकशी करून कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे आपल्या स्तरावरून प्रत्यक्ष पाहणी करून योग्य ती कार्यवाही करावी, अन्यथा नाईलाजास्तव आपल्या कार्यालयावर आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागेल, असे निवेदन दिले आहे. निवेदनावर भुली येथील ग्रामस्थ अजय पुसाडे, रोहिदास चव्हाण, ज्ञानेश्वर भगत, देवानंद शिंदे व खुशाल दोनदकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.