पातूर (Money rain case) : तालुक्यातील सावरखेड येथील जंगलात पैशाचा पाऊस पाडण्याचे अघोरी कृत्य करण्याकरिता कारंजा, पातूर, बार्शिटाकळी, अकोला येथील १२ ते १४ जमले होते. यामध्ये खोल दरीत पडून एका जणांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली होती. यामध्ये महान येथील एका डॉक्टरचा समावेश असल्याची माहिती समोर आली होती. पातूर पोलिसांनी (Patur Police) त्या डॉक्टरला शोधून काढले असून, त्या डॉक्टरच्या माध्यमातून या प्रकरणाचा तपास पातूर पोलीस करीत आहेत. यामध्ये (Money rain case) अकोल्यातील दोन मुलीसुद्धा समाविष्ट असल्याचे समोर आले आहे. तसेच जांब येथील एका महादेवाच्या मंदिरामध्ये राजू महाराज यांनी पैसे पाडण्याची पूजेचा विधी पार पडल्याचीही माहिती समोर आली आहे.
सावरखेड जंगलामध्ये पैशाचा पाऊस पाडण्याकरिता कारंजा बार्शिटाकळी अकोला व पातूर येथील १२ ते १४ जण जमले होते. सावरखेड जंगलामध्ये गोधन चोरणारी टोळी आल्याच्या संशयावरून ग्रामस्थांनी या पैशाचा पाऊस पाडणार्यांकडे धाव घेतली असता व्हॅगनारमधून पळत जात असताना व्हॅगनआर पलटी झाली. त्यानंतर बाहेर पडून पळत जात असताना एका खोल दरीत पडून कारंजा येथील रहमान खान हमीद खान (४५) यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती.
या प्रकरणी दोघांना पातूर पोलिसांनी ताब्यात सुद्धा घेतले होते. (Money rain case) पैशाचा पाऊस पाडण्याकरिता एका डॉक्टरांनी आम्हाला बोलावले असल्याचे ताब्यात असलेल्या दोघांनी पोलिसांना सांगितले. यामुळे (Patur Police) पातूर पोलिसांनी यामधील डॉक्टर मुख्य सूत्रधार असल्याचे समोर ठेवून तपासाची सूत्रे हलवली. या प्रकरणातील सूत्रधार डॉक्टर याचा शोध घेण्यास यश आले असून, महान येथील बाळू रमेश कालपाड असे या डॉक्टरचे नाव असून, त्याला पातूर पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. यामध्ये जांब येथील राजू महाराज अवचार या मांत्रिकाच्या माध्यमातून पैशाचा पाऊस पाडण्याची पूजेचा विधी जांब येथीrल एका महादेव मंदिरावर करण्यात आला होता. यावेळी दोन मुलींना पूजेकरिता बसविण्यात आल्या होत्या.
पूजा पार पडल्यानंतर उर्वरित काही जणांना घेण्याकरिता रहमान खान हमीद खान हा सावरखेड जंगलामध्ये आला व तिथून ते जंगलात जात असताना ग्रामस्थांना गोधन चोरणारी टोळी गावात आल्याच्या संशयावरून गावकर्यांनी त्यांचा पाठलाग केला होता. सध्या (Money rain case) याप्रकरणी कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नसला तरी पूर्ण तपास करून वरिष्ठ अधिकार्यांच्या मार्गदर्शनात या प्रकरणात सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तसेच अकोल्यातील त्या दोन युवतींचा पातूर पोलिस शोध घेत असून, लवकरच त्या मुलीसुद्धा पोलिसांच्या ताब्यात असणार असल्याची माहिती पातूर पोलिसांनी दिली आहे. जांब येथील राजीव महाराज अवचार यांचासद्धा शोध पातूर पोलीस घेत आहेत.
या (Money rain case) प्रकरणात महान येथील एका डॉक्टरला ताब्यात घेण्यात आले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. जांब येथील महादेव मंदिरावर पैशाचा पाऊस पाडण्याचा विधी राजू महाराज अवचार यांनी पार पाडला. यावेळी दोन मुलीसुद्धा या पूजेमध्ये बसल्या होत्या. या प्रकरणाची सगोल चौकशी सुरू असून, लवकरच या प्रकरणाचा उलगडा होऊन यातील सर्व जणांना ताब्यात घेऊन वरिष्ठ मार्गदर्शनात योग्य कारवाई करण्यात येईल.
– हनुमंत डोपेवाड, पोलीस निरीक्षक, पातूर