औषधांच्या पलीकडचे चर्चासत्रातील सुर
नाशिक (Doctor on Duty) : योग्य जीवनशैली हीच उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली आहे. सात्विक आहार ,मन प्रसन्न ठेवल तर अनेक आजारातून मुक्त होता येते, असे मार्गदर्शन शनिवार दि.20 रोजी गुरूदक्षिणा सभागृहात आयोजित (Doctor on Duty) डॉक्टर्स ऑन ड्युटी..औषधांच्या पलीकडले या चर्चासत्रात करण्यात आले. बदलती जीवनशैली ,वाढती महत्त्वाकांशा, यामुळे निर्माण होणारे आजार, मेटाबाॅलिक सिट्रोमंन्स मुळे निर्माण होणारे आजार यासह मधुमेह ,उच्चरक्तदाब ,ताण तणाव,पिसिओ ,वंध्यत्व, अनुवंशिक आजार यातून बाहेर पडण्यासाठीचे उपाय यावर चर्चा करण्यात आली.
चर्चासत्रात सिनियर जनरल फिजिशियन डॉ. विजय घाटगे, सिनियर कार्डिओलॉजिस्ट डॉ. नितीन घैसास, स्त्रीरोगतज्ञ डॉ. चंद्रकांत संकलेचा, उत्तम जीवनशैलीच्या मार्गदर्शक डॉ. विनिता देशपांडे यांनी सहभाग घेतला होता. चर्चासत्रात प्रश्नोत्तराच्या माध्यमातून जाहिरात तज्ञ नंदन दीक्षित यांनी बोलत केल.
सत्संग’ क्लिनिकचे सिनियर जनरल फिजिशियन डॉ. विजय घाटगे म्हणाले , वाढती लोकसंख्या चिंताजनक विषय आहे.. मधुमेह हा पुर्वी श्रीमंताचा आजार होता..पण ज्यांच लहानपण कुपोषणात गेल .त्यांना मधुमेह होण्याची शक्यता आहे.त्यामुळे हा गरीबांचा आजार झाला आहे. (Healthy lifestyle) पोषण व्यवस्थित होण गरजेच आहे. अनुवंशिकपणेमुळे मधुमेह होतो .. औषधाचे कमी प्रमाणात सेवण करावे. जास्त औषधाच सेवन हेही मधुमेहाच कारण आहे. वाढत्या महत्त्वकांक्षामुळे तान वाढून मधुमेह वाढत आहे.60 ते 70 टक्के आजार हे मनाचे असतात. मन प्रसन्न असेल तर आजार कमी होऊ शकतात. (Doctor on Duty) जी परिस्थिती आहे स्वीकारली तर तान कमी होऊ शकतो . चिंता असावी ,चिंता नसली तर आपण काहिच करू शकणार नाही.. पण अति चिंता आरोग्य खालावण्यास कारणीभूत ठरते. नोकरीत स्पर्धा ,अति महत्त्वाकांक्षा यामुळे आपण सतत धावत असतो पण यात जगायचंय राहून जात. आपण कितीही पैसा कमावला तरी तो इथेच ठेऊन जायचा आहे.. मात्र पैसे कमावण्याच्या नादात आरोग्याकडे दुर्लक्ष होते. आणि जेव्हा पैसा येतो तेव्हा आपण जगू शकत नाही. म्हणून दोन्ही गोष्टींचा समतोल हवा.
सिद्धी हॉस्पिटलचे सिनियर कार्डिओलॉजिस्ट नितीन घैसास म्हणाले उच्च रक्तदाब 30 टक्के लोकांमध्ये आहे. (Doctor on Duty) रक्तदाबामुळे 13 टक्के मृत्यू होतात. उच्च रक्तादासायलेंट किल्लर म्हणतात.. त्याची लक्षणे जाणवत नाही..आहारात मिठाचे ,साखरेचे कॅलरीजचे जास्त सेवण करणे,उशीरा जेवणे यामुळे उच्च रक्तदाब वाढतो. आहारात तंतुमय पदार्थ जीवनसत्त्वाचे सेवन केल्यास उच्च रक्तादाबावर नियंत्रण मिळू शकते. सर्व सुर जुळल्यावर सुंदर गाणे तयार होते.तसेच आरोग्य उत्तम राहण्यासाठी जीवनशैली असणे आवश्यक आहे.. योग्य आहार घ्यावा कामाचे आणि झोपेचे योग्य नियोजन करावे ,स्क्रिन टाइम कमी करावा नियमित पणे व्यायाम करावा म्हणजे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होईल.
संकलेचा हॉस्पिटलचे स्त्रीरोगतज्ञ चंद्रकात संकलेचा म्हणाले, वंध्यत्व आणि पीसिओ ची सध्या खुप समस्या वाढली आहे. महिला करिअर करत असल्यामुळे लग्न उशीरा होत आहे. त्यामुळे बाळ होण्यास उशीर होत आहे. मला मला पिसीओ आहे स्वताच ठरवल जात. त्यानंतर त्याबद्दल गूगलवर सर्च केल जात त्यातून तणाव वाढतो. अनियमित मासिक पाळी , वजन वाढणे याकडे दुर्लक्ष करू नका.जीवनशैली उत्तम राहण्यासाठी व्यायाम करायला हवा व सात्विक आहार घ्यायला हवा. वंध्यत्व अनुवंशिक नाही.. अनेकांचा गैरसमज असतो की वंध्यत्व अनुवंशिक आहे पण तसे नाही. प्रत्येकाच्या शरीराची रचना ,त्याना मिळणारे पोषक घटक वेगळे असतात ..
उत्तम जीवनशैलीच्या मार्गदर्शक विनिता देशपांडे म्हणाल्या, वजन वाढायला लागतं हे आनंदाची गोष्ट आहे. वजन वाढत असल्यास पुढे इतर आजार होतील म्हणून आपण प्रतिबंधात्मक उपाय करू शकतो. आपण खाल्ल्यानंतर त्याचं पचन झाल्यानंतर आपल्या शरीरामध्ये रक्तामध्ये साखर निर्माण होते. साखरेचे जास्त सेवण झाले तर लठ्ठपणा वाढतो. बाह्य स्वरूपामध्ये जो लठ्ठपणा आपल्याला दिसतो. उपास करायला हवा.. उपास करण सोप आहे.पण उपासाला काय खातो हे महत्त्वाच आहे. (Doctor on Duty) महिलांनी कुटुंबाचे आरोग्य सांभाळत असतात स्वताचे पण आरोग्य जपायला हवे .. मुलांना चवीची ओळख आई करून देत असते.मुलांना जे खायला दिले जाते ते तेच मागतात.
त्यामुळे मुलांना खायला देताना जंक फुड देण्याऐवजी पौष्टिक पदार्थ खायला द्यावेत. म्हणजे लहान वयात लठ्ठपणा या समस्या होणार नाहीत. व मुलांची योग्यरीतीने वाढ होईल. यावेळी दिपक ब्लिडरचे दीपक चंदे ,गिरीश टकले, सन फार्माचे राजन दातार, डॉ. प्रीती बजाज, ज्ञानेश्वर महाजन, यश राय उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीला दीपप्रज्वलन करण्यात आले. मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पियू आरोळे यांनी केले.