गोंडपिपरी (Chandrapur):- शहरात सुरजागड लोह प्रकल्पातील अवजड वाहनांच्या दळण वळणामुळे रहदारीस मोठा अडथळा निर्माण होत आहे. या करिता येथील नागरिकांच्या सुरक्षेसाठी व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस प्रशासनाने कंबर कसली असून यासाठी अनेक पोलिस कर्मचारी तसेच गृह रक्षक दल (Home Guard Force) कर्तव्य बजावत आहेत. अशात अनेक अवैध तस्करीचे मामले समोर आले आणि असे अनेक असंवैधानिक गोष्टी येथे राजरोसपणे घडत असतात.
पोलिसांकडून शहराच्या हद्दीमध्ये कसून गस्त सुरू
याकरिता पोलिसांकडून शहराच्या हद्दीमध्ये कसून गस्त सुरू आहे. यामध्ये अनेक प्रकारचे कारवाया करण्यात गोंडपिपरी पोलिसांना पावलोपावली यश आले. अशीच घटना दिनांक १६ जुलै रोजी चंद्रपूर अहेरी महामार्गावरील शासकीय धान्य गोडाऊन (Govt Grain Godown) समोर गस्त घालत असताना घडली. चंद्रपूर मार्गे अहेरीकडे येणारा ऑटो रिक्षा क्रमांक एमएच- ३४ डी-८३४३ मध्ये अवैध दारूचा पुरवठा केला जात असून ऑटो माल भरून अहेरीकडे निघालेला आहे. अशी खात्रीशीर गुप्त बातमी ठाणेदार रमेश हत्तीगोटे यांना गुप्तहेर कडून मिळाली. गस्तीवर असणार्या पोलिसांना ठाणेदारांनी याबाबत माहिती दिली आणि गस्त अधिकच तीव्र आणि पारदर्शक करण्याची सूचना केली. सदर व्यक्ती नेहमी प्रमाणे आपल्या ऑटो रिक्षात देसी-विदेशी दारूचा माल घेऊन निघाला. परंतु समोर आपली वाट लावायला पोलिस तळ ठोकून आहेत हे त्याला कळाले नाही. शेवटी दारू धरून निघालेला संशयीत ऑटो (Auto)आपल्या नियतीच्या ठिकाणी पोहचला.
ऑटोला थांबा देत ऑटोच्या मागच्या भागाची तपासणी
दरम्यान पोलिसांनी ऑटोला थांबा दिला आणि ऑटोच्या मागील भागाची तपासणी केली, असता त्यात एका चुंगळीमध्ये ९० एमएल चे २१० नग देशी दारु किंमत ७३५० आणि १८० एमएल च्या रॉयल स्टॅग व्हिस्कीच्या २९ नग निपा किंमत ३६०० रूपयेचा दारू साठा आढळून आला आणि दारुची वाहतूक करण्यात वापरलेला ऑटो असा एकूण ८०,९५० रुपयेचा मुद्दे माल पोलिसांनी जप्त करुन ऋतिक निळकंठ कन्नाके (२९) राहणार मौलाना आझाद वार्ड बल्लारपूर याचेवर कलम ३५ (३) बिएनएस २०२३ नुसार गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली. सदरची कार्यवाही ठाणेदार रमेश हत्तीगोटे, पोलिस शिपाई मनोहर मत्ते, पुलगमकर, शांताराम पाल यांचे सह गृह रक्षक दलाच्या जवानांनी केली. (ता.प्र.)