‘या’ यादीत इतर देशांचाही समावेश!
वाशिंग्टन (Donald Trump) : डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) प्रशासन पाकिस्तान (Pakistan Ban) आणि अफगाणिस्तानवर संपूर्ण प्रवास बंदी घालण्याची तयारी करत आहे. या देशांमधील सुरक्षा परिस्थिती आणि संभाव्य धोक्यांचा आढावा घेतल्यानंतर अमेरिकन सरकारने हा निर्णय घेतला आहे. नवीन प्रवास बंदी पुढील आठवड्यापासून लागू होऊ शकते. पाकिस्तानी (Pakistan Ban) नागरिकांना अमेरिकेत प्रवेश करण्यास बंदी घातली जाणार आहे. अफगाणिस्तानातून (Afghanistan) येणारे विशेष स्थलांतरित व्हिसा (SIV) आणि निर्वासित व्हिसा धारक या निर्णयाने प्रभावित होऊ शकतात. या (Pakistan Ban) बंदी यादीत इतर देशांचाही समावेश होऊ शकतो.
ट्रम्प यांचे विधान आणि त्याचा पाकिस्तानवर होणारा परिणाम
ट्रम्प (Donald Trump) म्हणाले की, ‘आपल्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी कठोर पावले उचलणे आवश्यक आहे. दहशतवादविरोधी कारवाईबद्दल त्यांनी पाकिस्तानचे आभार मानले. परंतु सुरक्षेच्या कारणास्तव ही बंदी आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. (Pakistan Ban) पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी (Donald Trump) ट्रम्प यांच्या विधानाचे स्वागत केले. परंतु निर्बंधांच्या संभाव्य परिणामांबद्दल चिंता व्यक्त केली.
ट्रम्प यांचा इतिहास आणि मुस्लिम देशांवरील बंदी
2017 मध्ये त्यांच्या पहिल्या कार्यकाळात ट्रम्प (Donald Trump) यांनी इराण, इराक, लिबिया, सोमालिया, सुदान, सीरिया आणि येमेनवर प्रवास बंदी घातली होती. जो बायडेन (Joe Biden) यांनी 2021 मध्ये ही बंदी उठवली. आता ट्रम्प पुन्हा एकदा पाकिस्तान आणि (Afghanistan) अफगाणिस्तानवर कडक नियम लादण्याचा विचार करत आहेत. ट्रम्प प्रशासनाचे (Donald Trump) हे धोरण पाकिस्तान (Pakistan Ban) आणि अफगाणिस्तानातील नागरिकांसाठी मोठा धक्का ठरू शकते. जर ही प्रवास बंदी लागू झाली तर, हजारो लोकांना अमेरिकेत प्रवेश करण्यापासून रोखले जाऊ शकते. सर्वांच्या नजरा आता अमेरिकेच्या अधिकृत घोषणेकडे लागल्या आहेत.