हिंगोली (Hingoli BJP) : शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने महायुतीचे भाजपचे अधिकृत उमेदवार तानाजीराव मुटकुळे यांच्या प्रचारार्थ ९ नोव्हेंबर रोजी संपूर्ण हिंगोली शहरात प्रचार करण्यात आला.
हिंगोली शहरातील १६ पैकी १४ प्रभागात सकाळी ०९.०० वाजता अत्यंत शिस्तबद्धरीत्या भारतीय जनता पक्षाचे शहरातील कार्यकर्त्यांनी माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांचे सूचनेनुसार व शहराध्यक्ष कैलास चंद्र काबरा यांच्या मार्गदर्शनानुसार प्रभाग निहाय प्रचार रॅली चे नियोजन केले होते. त्या अनुषंगाने प्रत्येक प्रभागात (Hingoli BJP) भाजपचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन मतदारांना तानाजी रावांनी केलेले दहा वर्षातील विकास कामाची माहिती देऊन आगामी विधानसभेत पुनश्च त्यांना निवडून देणे साठी आव्हान केले. या संपूर्ण प्रभाग निहाय प्रचारामुळे आज संपूर्ण शहर भाजपामय झाल्याचे दिसून आले. तसेच महिला आघाडीच्या सुद्धा प्रचारासाठी महिला सरसावलेल्या दिसून आल्या होत्या.