उस्तुरी येथे पिता-पुत्रावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
कासारशिरसी (Double Murder case) : शेतीच्या वादातून तिघा भावांनी केलेल्या हल्ल्यात ठार झालेल्या भाऊ व पुतण्या या पिता-पुत्रावर शुक्रवारी उस्तुरी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेतील तिन्ही आरोपींना निलंगा न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर न्यायालयाने तिघा आरोपींना सोमवारपर्यंत (दि. २०) पोलीस कोठडी सुनावली.
निलंगा तालुक्यातील उस्तुरी येथे शेतीच्या वादातून सख्या (Double Murder case) तीन भावांनी संगनमत करून गुरुवारी (दि.१६) लाठ्या-काठ्यांनी अचानक केलेल्या हल्ल्यात मोठा भाऊ व पुतण्या ठार झाले. या (Double Murder case) घटनेत मयत सुरेश बिराजदार (वय ५०) व त्यांचा मुलगा साहिल बिराजदार (वय २२) यांचा मृत्यू झाला. या पिता-पुत्राच्या पार्थिवाची उत्तरीय तपासणी येथील ग्रामीण रुग्णालयात करून शुक्रवारी (दि. १७) दुपारी पार्थिव नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. या पार्थिवांवर उस्तुरी येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.
या (Double Murder case) घटनेतील गंभीर जखमी असलेला दुसरा मुलगा गणेश बिराजदार याला काल रात्री निलंगा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र निलंगा उपजिल्हा रुग्णालयातून त्याला लातूर येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या (Double Murder case) घटनेतील तिन्ही आरोपींना निलंगा येथील न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्या (Double Murder case) तिन्ही आरोपींना न्यायालयाने २० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.