कारंजा(Washim) :- स्थानिक जुने एस.टी. बसस्थानक (ST bus station) परिसरातील रहिवासी २७ वर्षीय विवाहित महिलेने २ ऑगस्ट रोजी राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या (Suicide)केली होती. या प्रकरणी तिच्या पतीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा नोंदवण्यात येवून त्यास अटक करण्यात आली आहे.
चारित्र्यावर घेत होता संशय
कारंजा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पती हा त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेवून वारंवार शारीरिक(Physical) व मानसिक (mental distress) त्रास द्यायचा. अखेर या त्रासाला कंटाळून त्याची पत्नी निकिता धीरज नवघण हिने २ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. दरम्यान, याप्रकरणी मृतक विवाहित महिलेचे वडील प्रकाश विठ्ठल कळसाईत (५२, रा.अमरावती) यांनी २ ऑगस्ट रोजी रात्री उशिरा येथील शहर पोलिस स्टेशनमध्ये मुलीच्या पतीविरुद्ध फिर्याद दाखल केली. या फिर्यादीत त्यांनी आरोपी हा मुलगी निकिता हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला वारंवार त्रास देत होता. या त्रासापोटी तिने आत्महत्या केली, असा उल्लेख करून तिच्या मृत्यूस आरोपी हाच जबाबदार असल्याचे नमूद केले आहे. त्यानुसार पोलिसांनी आरोपी धीरज विजय नवघण (३२) याचाविरुद्ध कलम ८५, १०८, ३५२, ३५१, ३ बी.एन. एस.नुसार गुन्हा दाखल केला असून, त्याला अटक करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक दिनेशचंद्र शुक्ला यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक अर्जुन राठोड करीत आहेत.