पुसद (Dr. Akil) : येथील डॉ. अकील यांना यापूर्वी आचार्य पदवी, दुबई येथे खेळ रत्न पुरस्काराने सन्मानित झालेली डॉ.म. अकील (Dr. Akil) माजी केंद्रप्रमुख, फुटबॉलपटू तथा राष्ट्रीय पंच व प्रशिक्षक यांचा रायपूर छत्तीसगड येथे एक सप्टेंबर रोजी भारतभूषण या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जगदलपूरचे महाराजा कमलचंद बडदेव, पद्मभूषण डॉ राधेश्याम बारले,खा. गुरु खुशाबजी व डॉ. मनु चेलकजी यांची प्रमुख उपस्थिती व यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.
यापूर्वी त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य राज्य त्याचा राष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. यापुढे पद्मभूषण लिमका गिनीज बुक रेकॉर्ड मध्ये नाव येण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. सेवानिवृत्तीनंतर त्यांचा अनेक संघटनांतर्फे 400 हून अधिक सत्कार तर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय 41 सन्मान मिळाले आहेत हे विशेष.