अमरावती (Dr. Babasaheb Ambedkar) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त (Mahaparinirvana day) काँग्रेस पक्षाच्या वतीने अस्थिकलश बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅलीची सुरुवात अमरावती शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) चौकातून झाली. या रॅलीत काँग्रेस नेत्या व माजी मंत्री यशोमती ठाकूर, खासदार बळवंत वानखडे, तसेच कर्नाटक येथील सर्वात तरुण आमदार प्रदीप ईश्वर यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
रॅलीचा मार्ग डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) चौक ते बाबासाहेबांचे अस्थिकलश असलेल्या नया अकोला पर्यंत ठेवण्यात आला. माजी मंत्री यशोमती ठाकूर स्वतः बाईक चालवत रॅलीत सहभागी झाल्या, त्यामुळे रॅलीला विशेष आकर्षण प्राप्त झाले. या रॅलीमध्ये माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्यासह हरीश मोरे, संजय नागोने, अभय देशमुख, पंकज देशमुख, शैलेश काळबांडे, डॉ. कुरलकर, अमित गावंडे, राम खंदार, दिलीप सोनीने, प्रमोद तसरे, विठ्ठल मोहोड, शैलेश दुपारे, गजानन राठोड, प्रशांत पाटील, अमोल गुडधे, अभय वंजारी, नरेंद्र मकेश्र्वार, सुकुमार खंदारे, धम्म गुडढे, दीपक सरदार, गौतम दाभाडे, मुकंदरव देशमुख, सतीश गोटे, आशुतोष देशमुख, श्रीकांत बोंडे, डॉ. शंकर ठाकरे, राहुल उके, राजकुमार सरवातकर आदी मान्यवर उपस्थित होते.
नया अकोला येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या अस्थिकलशाला अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचे स्मरण करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने या रॅलीचे आयोजन केले जाते. यावर्षी देखील नया अकोला येथे रॅलीचा यशस्वी समारोप झाला.