अचलपूर शहरातील बुंदेलपुरा परीसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर रात्री त्रिशूल व दगडफेकीच्या प्रकारातून दोन समाजात तणाव
दोन्ही पक्ष काराकडून पोलीसात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल
डॉ. बाबासाहेब पुतळा व शिव मंदीर ओटा लागुनच या आधी पण बांधकामा वरून तणाव झाला होता
घटना स्थळी प्रशाशना कडून सिसी टीव्ही कॅमेरे , घटना स्थळी तगडा बंदोबस्त, स्थिती नियंत्रणाखाली
अचलपुर (Dr. Babasaheb Ambedkar) : अचलपुर शहरातील बुंदेलपुरा भागात २० डिसेबर सकाळी २ ते ३ च्या दरम्यान डॉ .बाबासाहेबांच्या पुतळ्या समोर दोन त्रिशुल रोऊन त्या भागात दगडफेक केल्याची घटना घडली .सकाळी स्थानिकांच्या लक्षात येताच मोठा जमाव घटना स्थळी जमला होता यावेळी अचलपूर पोलीस प्रशासनाने तगडा बंदोबस्त लावून परिस्थितीवर नियंत्रण मिळवली या दोन्ही पक्षाकारांनी अचलपूर पोलीस स्टेशनमध्ये परस्पर विरोधी दिलेला तक्रारीवरून पोलीस स्टेशनमध्ये दोन्ही पक्षाकारातील एकूण 21 जणांविरोधात विविध कलम अन्वय गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, अचलपूर पोलीस स्टेशन मध्ये वानखडे नामक महिलेने दिलेल्या फिर्यादी त म्हटले की आज २० डिसेंबर रोजी (Dr. Babasaheb Ambedkar) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर गेल्या अनेक दिवसांपासून दोन समाजामध्ये किरकोळ वाद सुरू होता . आज 20 डिसेंबर रोजी सकाळी बाबासाहे बांच्या पुतळ्या समोर दरम्यान दोन त्रिशूल आणि पुतळ्यासमोर विटा गिट्टी राख असल्याचे काही नां दिसून आले आणि यामुळे डॉ . बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या पुतळ्याची अवहेलना झाल्याची तक्रार फिर्यादीने दिलेली आहे . यानुसार अचलपूर पोलीस स्टेशन मध्ये सनी नामक युवक तसेच इतर ९ जणांविरोधात कलम 298, ३ (५) बी एन एस सह कलम ॲट्रॉसिटी ३ (१) T अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
त्यासोबत दुसऱ्या फिर्यादी मेघा नामक महिलेने अचलपूर पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की आम्ही पारंपरिक त्या जागी त्रिशूल ची नेहमी पूजा करत आलो आहो . पण लता नामक महिला तसेच इतर १० लोक येथे पूजा करू नये अशी धमकी दिली व ॲट्रॉसिटी ॲक्ट दाखल करण्याची सुद्धा धमकी देत होते त्यामुळे आज त्यांनी खोटी तक्रार दिली अशी तक्रार अचलपूर पोलीस स्टेशन मध्ये दिली त्या नुसार लता नामक महिला व इतर १० जणांविरुद्ध कलम १८९ (2) ३५१ (2) ३५२ बी एन एस अन्वय गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे.
आज सकाळी ही घटना समोर येताच घटनास्थळी नागरिकांची प्रचंड गर्दी होती. अचलपूर पोलीस उपविभागीय अधिकारी . शुभम कुमार, अचलपूर नगर परिषदेचे प्रशासक धिरज कुमार गोहाड ,अचलपूर चे नायब तहसीलदार अक्षय मंडवे, अचलपुर चे ठानेदार गजानन मेहत्रे सह पोलीस , महसूल चे कर्मचारी उपस्थित होते. एवढी अचलपूर नगरपरिषद प्रशासनाने 20 डिसेंबर रोजी लावण्यात आलेले त्रिशूलही जप्त केल्याची माहिती प्राप्त झाली आहे.यापुढे त्या स्थळी कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी तत्काळ सीसीटिव्ही कॅमेरे लावण्यात आले.
सध्या परिस्थिती नियंत्रणाखाली असून कोणत्याही अफवावर नागरिकांनी विश्वास न ठेवता शांतता कायदा सुव्यवस्थेसाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन अचलपूर उपविभागीय पोलिस अधिकारी शुभम कुमार यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना केले .