निलंगा (Latur):- काँग्रेसने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना (Dr. Babasaheb Ambedkar)सतत छळले. लोकसभा निवडणुकीत (Elections)त्यांना दोनदा पराभूत केले. त्या काँग्रेसला हद्दपार करून माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांना बहुमताने चौथ्यांदा विधानसभेत पाठवा. मंत्री करण्याची जबाबदारी माझी असल्याचे अभिवचन केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले दिले.
संभाजीरावांना आमदार करा, नामदार करण्याची जबाबदारी माझी : केंद्रीय मंत्री रामदास आठवले
निलंगा येथील वृन्दावन मंगल कार्यालयात रविवारी (दि.10) संविधान सन्मान सभेत भाजपा महायुतीचे उमेदवार माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी माजी खा.अमर साबळे, माजी खा. सुनिल गायकवाड, युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर, आर.पी.आय.जिल्हाध्यक्ष बाबासाहेब कांबळे, उपाध्यक्ष अंकुश ढेरे, साधू कटके, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, उपाध्यक्ष, मनोज कोळे, सुधीर पाटील उपस्थित होते. या विधानसभा निवडणुकीमध्ये संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पाठीशी खंबीरपणे राहा. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान मजबूत करण्यासाठी संभाजीराव पाटलांना विजयी करा, त्यांना मंत्री केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
भारतरत्न पदवी सुद्धा काँग्रेस पक्षाने बाबासाहेबांना दिली नाही, ही फार मोठी शोकांतिका
खासदार अमर साबळे म्हणाले की, काँग्रेस (Congress)पक्षाचे संविधानाचे प्रेम म्हणजे मगरीच्या डोळ्यातील अश्रू सारखे आहे. या निवडणुकीत काँग्रेसला त्याची जागा दाखवून माजी मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. तर भारतरत्न पदवी सुद्धा काँग्रेस पक्षाने बाबासाहेबांना दिली नाही, ही फार मोठी शोकांतिका आहे. भारतीय जनता पार्टी बद्दल काँग्रेस पक्षाने गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप माजी खासदार डॉ. सुनील गायकवाड यांनी केला.
लोकसभा निवडणुकीत फेक नरेटीव्हचा वापर करून मागासवर्गीयाचे मते मिळवण्याचा प्रयत्न
लोकसभा निवडणुकीत फेक नरेटीव्हचा वापर करून मागासवर्गीयाचे मते मिळवण्याचा प्रयत्न झाला. संविधाना समोर नतमस्तक होणारे एकमेव पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)असून भारताचे संविधान हा भारतीयांसाठी आदर्श दागिना आहे. या संविधान सन्मान सभेला मोठ्या प्रमाणात महिलांची उपस्थिती होती शिवाय हातामध्ये निळे झेंडे डोक्यावर निळ्या टोप्या घालून ग्रामीण भागातील महिला व पुरुष युवक मोठ्या प्रमाणात उपस्थित असल्यामुळे सगळे सभेचे वातावरण निळे निळे झाले होते. यावेळी संतोष वाघमारे, दयानंद कांबळे, प्रकाश गायकवाड, अरविंद कांबळे विष्णू ढेरे, रमेश ढेरे,सचिन गायकवाड, कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिगंबर सूर्यवंशी यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार संजय दोरवे यांनी मानले.