– खा. डॉ. प्रशांत पडोळे यांचे प्रतिपादन
अर्जुनी मोर (Dr. Bharat lade Health Camp) : जनसामान्यांच्या आरोग्याचा प्रश्न सुटावा व त्यांना उत्तम आरोग्य सेवा मिळाव्यात यासाठी जनआंदोलन उभे करून सतत जनतेच्या समस्यांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून मा. डॉ. भारत लाडे (Dr. Bharat lade) हे अथक प्रयत्न करत आहेत. गेल्या अनेक वर्षात त्यांनी (Health Camp) आरोग्य शिबिर आयोजित करून हजारो रुग्णांना मोफत वैद्यकीय उपचाराची सोय केली आहे.
याच भावनेने दिनांक 18 आगस्ट 2024 ला मौजा. सौंदड ता. सडक अर्जुनी येथे डॉ. भारत लाडे (Dr. Bharat lade) मित्र परिवार ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल वानाडोंगरी नागपूर जीवन आधार संस्था, रोटरी क्लब आफ साऊथ ईस्ट नागपूर तालुका काँग्रेस कमेटी सडक अर्जुनी, अर्जुनी मोर. व गोरेगाव यांच्या संयुक्त विद्यमानाणे सौंदड येथे मोफत आरोग्य तपासणी मोतीबिंधू शस्त्रक्रिया, उपचार व मोफत चष्मे वितरन जिल्हा परिषद शाळा सौंदड येथे आयोजित करण्यात आला होता. या (Health Camp) शिबिरात 1648 रुग्णांनी आपल्या आरोग्याची तपासणी केली. यामध्ये अनुभवी डाक्टरांकडून 1027 रुग्णांना मोफत चष्मे देण्यात आले. व 212 रुग्णांना निशुल्क मोतीयाबिंदू व इतर शस्त्रक्रियसाठी नागपूर ला रेफर करण्यात येईल. विनामूल्य तपासणी आणि सल्ला, मोफत रक्तदाब, वजन, इसीजी, रक्तातील साखर तपासणी, डॉक्टरांच्या सल्यानुसार मोफत औषध, डोळ्यांची मोफत तपासणी व लगेंच मोफत चष्मे वितरण करण्यात आले.
डॉ. भारत लाडे यांनी आयोजित केलेल्या शिबिरात 1648 रुग्णांनी केली आरोग्य तपासणी
या शिबिराचा परिसरातील गरीब, गरजू व वयोवृद्ध रुग्णांना मोफत वैद्यकीय लाभ घेता आला. त्यामुळेच या आरोग्य शिबिराला जनतेचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे. (Health Camp) आरोग्य तपासणीसाठी स्थानिकच नव्हे तर सौंदड परिसरातील बहुसंख्य गरजू रुग्णांनी लाभ घेतला.
शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी मा. खासदार डॉ प्रशांत पडोळे, राजुभाऊ पालिवाल प्रदेश प्रतिनिधी महाराष्ट्र काँग्रेस , मधुसूदन दोनोडे तालुका काँग्रेस अध्यक्ष सडक अर्जुनी, दामोदरजी नेवारे प्रदेश प्रतिनिधी काँग्रेस , राजेश नंदागवळी माजी समाज कल्याण सभापती, किरण ताई हटवार ता.महिला अध्यक्ष काँग्रेस,पुष्पाताई खोटेले महासचिव काँग्रेस कमिटी, गायत्रीताई इरले माजी सरपंच सौंदड, अनिल मेश्राम सामाजिक कार्यकर्ता, राजेंद्र जनबंधू ता.अध्यक्ष युवक काँग्रेस, डॉ दीपक खुटे, भास्करजी यावलकर माजी उपसरपंच, मंगेश मोदी, रेखाताई राऊत, समाधानजी बडोले, नंदकिशोर डोंगरवार आणि डॉ. भारत लाडे (Dr. Bharat lade) मित्रपरिवार यांच्या उपस्थितीत आरोग्य तपासणी शिबिराचा (Health Camp) कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडला. या कार्यक्रमाचे संचालन रोशन शिवणकर यांनी केले. डॉ. भरत लांडे (Dr. Bharat lade) यांची विधानसभेची काँग्रेस पक्षाकडूनउमेदवारी घेण्याची मनसुबा दिसत असून जनतेचा पाठिंबा त्यांना असावा, असं सर्वत्र बोलल्या जात आहे.