लातूर (Latur): राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचा शैक्षणिक व्हिडिओ निर्मितीसाठी डॉ. उमाकांत जाधव यांना राज्यस्तरीय पुरस्कार (State level award) जाहीर झाला आहे.
सन २०२३ मध्ये महाराष्ट्रातील शिक्षकांच्या माध्यमातून राज्यस्तरीय शैक्षणिक व्हिडिओ (video)निर्मिती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी सहा गटामध्ये विषयानुसार शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती करावयाची होती. यात प्रत्येक विषयानुसार तीन याप्रमाणे महाराष्ट्रातील 84 शिक्षकांची या राज्यस्तरीय पुरस्काराकरिता निवड करण्यात आली असून लातूर जिल्ह्यातून एकमेव डॉ. उमाकांत लक्ष्मणराव जाधव या उपक्रमशील शिक्षकाची निवड करण्यात आली आहे. डॉ उमाकांत जाधव हे श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय लातूर येथे मराठी भाषा विषयाचे अध्यापन करतात. पत्रलेखन या त्यांच्या (ई साहित्य निर्मितीस) दर्जेदर व्हिडिओ निर्मितीस त्याना राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. या पुरस्काराचे वितरण उद्या रविवारी पुणे येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते व शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत होणार आहे. यावेळी मान्यवर नेते अधिकारी उपस्थित राहणार आहेत. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ. उमाकांत जाधव यांचे सर्वत्र स्वागत होत आहे.