Former Prime Minister Dr. Manmohan Singh:- देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग(Dr. Manmohan Singh) आता आपल्यात नाहीत. काल रात्री त्यांचा मृत्यू(Death) झाला. गुरुवारी संध्याकाळी त्यांची तब्येत खूपच खालावली, त्यानंतर त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले पण लाखो प्रयत्न करूनही त्यांना वाचवण्यात अपयश आले.
लाखो प्रयत्न करूनही त्यांना वाचवण्यात अपयश
वयाच्या ९२ व्या वर्षी जगाचा निरोप घेणारे मनमोहन सिंग यांच्या निधनाने राजकारणातील एका युगाचा अंत झाला आहे. देशात ७ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला असताना काँग्रेसने (Congress)आपले सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. डॉ.मनमोहन सिंग यांची मुलगी अमेरिकेतून भारताला रवाना झाली असून आज संध्याकाळपर्यंत ती दिल्लीला पोहोचणार आहे, त्यामुळे शनिवारी डॉ.मनमोहन सिंग यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
याबाबत बोलताना दिल्लीतील काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, ‘आम्ही याची अधिकृत घोषणा करू.’ मनमोहन सिंग हे देशाचे पंतप्रधान राहिले आहेत, त्यामुळे त्यांच्या पार्थिवावर पूर्ण शासकीय सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
26 सप्टेंबर 1932 रोजी अविभाजित भारतातील पंजाब प्रांतात जन्म
डॉ. मनमोहन सिंग यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी अविभाजित भारताच्या पंजाब (Punjab)प्रांतात झाला होता. फाळणीनंतर त्यांचे कुटुंब भारतात आले. डॉ.सिंग यांनी पंजाब विद्यापीठातून सुरुवातीचे शिक्षण घेतले. यानंतर त्यांनी केंब्रिज विद्यापीठ आणि ऑक्सफर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्राचे उच्च शिक्षण घेतले. अर्थतज्ज्ञ (Economist) म्हणून करिअरची सुरुवात डॉ. सिंग यांनी अर्थतज्ज्ञ म्हणून करिअरची सुरुवात केली. युनायटेड नेशन्स, इंटरनॅशनल मॉनेटरी फंड (IMF) आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये (Reserve Bank of India) त्यांनी विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले. 1991 मध्ये, जेव्हा भारत आर्थिक संकटाचा सामना करत होता तेव्हा तत्कालीन पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव यांनी त्यांना अर्थमंत्री(Finance Minister) म्हणून नियुक्त केले.
‘भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी हा सुवर्णकाळ’ डॉ. सिंग यांनी 1991 मध्ये भारताच्या आर्थिक सुधारणांचे नेतृत्व केले. त्यांनी उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरणाची धोरणे राबवली. भारतीय अर्थव्यवस्थेसाठी हा सुवर्णकाळ होता.
शासकीय सन्मानाने अंत्ययात्रा
- राष्ट्रध्वजाचा वापर
- बंदुकीची सलामी
- लष्करी बँड
- शोक मिरवणूक
श्रद्धांजली (Tribute) अर्पण करण्यापूर्वी, म्हणजे, अंतिम संस्कारापूर्वी, पार्थिव प्रथम तिरंग्यात गुंडाळले जाते आणि नंतर 21 तोफांची सलामी दिली जाते. 7 दिवसांचा राष्ट्रीय शोक जाहीर केला जातो आणि या काळात तिरंगा अर्ध्यावर असतो आणि देशात कोणतेही राष्ट्रीय ऐतिहासिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रम होत नाहीत.