अमरावती (Dr. Punjabrao Deshmukh) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) नुकताच दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी परीक्षा 2023 चा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. यात डॉ. पंजाबराव देशमुख (Dr. Punjabrao Deshmukh) विधी महाविद्यालयाच्या तीन विद्यार्थ्यांची न्यायाधीश म्हणून निवड करण्यात आली. सदर प्रकाशित झालेल्या गुणवत्ता यादीत ॲड. अभिजीत खोत (Adv. Abhijit Khot), ॲड. खुशबू झांजोटे व ॲड. प्रीती डोंगरे यांना नाव मिळून त्यांची न्यायाधीश म्हणून निवड करण्यात आली.
सदरील तिन्ही विद्यार्थी कॉलेजतर्फे चालवल्या जाणाऱ्या न्यायाधीश परीक्षा प्रशिक्षण केंद्राचे विद्यार्थी होते. सदरील परीक्षा तीन टप्प्यात घेण्यात येते. (MPSC) पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा व मुलाखत. (Dr. Punjabrao Deshmukh सदरील विद्यार्थ्यांनी या तिन्ही टप्प्यांना यशस्वीरित्या पार करीत गुणवत्ता यादीत नाव मिळविले. या तिन्ही विद्यार्थ्यांची न्यायाधीश म्हणून निवड करण्यात आली.
याआधीही डॉ. पंजाबराव देशमुख (Dr. Punjabrao Deshmukh) विधी महाविद्यालयाद्वारे चालवण्यात येणाऱ्या न्यायाधीश परीक्षा प्रशिक्षण केंद्रातून अनेक विद्यार्थ्यांची न्यायाधीश म्हणून निवड झालेली आहे. या (MPSC) वर्षी देखील यशाची परंपरा कायम ठेवत प्रशिक्षण केंद्रांच्या तीन विद्यार्थ्यांची न्यायाधीश म्हणून निवड झाली. प्राचार्य डॉ वर्षा देशमुख व न्यायाधीश परीक्षा प्रशिक्षण केंद्राचे संचालक डॉ. राजेश पाटील व विद्यालयाच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. महाविद्यालयाच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.