परभणीत विविध मागण्यांसाठी दिले निवेदन
परभणी (Teachers Council) : डॉ.पंजाबराव देशमुख शिक्षक परीषद (Teachers Council), राष्ट्रवादी शिक्षक संघटना यांच्या वतीने शिक्षकांच्या विविध मागण्यांचे गुरुवार ११ जुलै रोजी शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्या मार्फत मुख्यमंत्री व शिक्षण मंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले. निवेदनात अंशत: अनुदानित शाळा, महाविद्यालयांना प्रतिवर्षी टप्पा वाढ लागू करा, अघोषित शाळा, महाविद्यालयांना पात्र करून अनुदान वितरीत करावे, त्रुटीपुर्ती केलेल्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक वर्ग तुकड्यांना समान टप्पा वाढ करावी, २००५ पुर्वीच्या नियुक्त शिक्षक व कर्मचार्यांना जुनी पेन्शन योजना (Old Pension Scheme) लागू करावी, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
निवेदनावर डॉ.पंजाबराव देशमुख (Dr. Punjabrao Deshmukh) शिक्षक परिषदेचे प्रदेश महासचिव नवनाथ जाधव, जिल्हाध्यक्ष नागोराव माने, पदेश महासचिव बाळासाहेब यादव, जिल्हाध्यक्ष प्राथमिक गजानन सोळंके, मार्गदर्शक सुधाकर कदम, कार्यालयीन सचिव मनोज गायकवाड, एन.एस.पौळ, व्ही.आर. देशमुख, ए.एस. परसोडे, व्ही.बी. जाधव, व्ही.व्ही. बोबडे व पी.आर. जाधव आदींच्या स्वाक्षर्या आहेत.