जोडलेली माणसं खंबीरपणे सोबत असल्याचा पदाधिकार्यांना विश्वास..
सिं. राजा (Dr. Rajendra Shingane) : या जिल्ह्यात राजकारणाला समाजकारण मानून गेली तीस, पस्तीस वर्षे डॉ. राजेंद्र शिंगणे या जिल्ह्यात काम करीत आहेत, ते केवळ मतदारसंघाचे नाही तर या जिल्ह्याचे प्रमुख,अजातशत्रू नेतृत्व आहे.त्यांनी या राजकीय प्रवासात जोडलेली मानस खंबीरपणे त्यांचे सोबत असून मतदार संघातील मतदार आणि विश्वासू मानस यांच्या संयुत्त्ाâ प्रयत्नातून डॉ. शिंगणे (Dr. Rajendra Shingane) हे सहाव्यांदा विजयी होतील, असा विश्वास ज्येष्ठ पदाधिकारी सतीश काळे (Satish Kale) यांनी व्यक्त केला.
येथील पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. कार्यकर्त्यांनी प्रचार कामाची दिलेली जबाबदारी शिस्तीत पार पाडावी, कोणती अडचण असल्यास ज्येष्ठ पदाधिकार्यांचे मार्गदर्शन घ्यावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. डॉ. शिंगणे (Dr. Rajendra Shingane) यांचे कार्य, शेतकर्यांसाठी दिलेले योगदान, सर्वसमावेशक विकास हा जनतेपर्यंत मांडला गेला पाहिजे. डॉ. शिंगणे हे सामान्यांना उपलब्ध होत नाही, हा विरोधकांचा कांगावा असून सामान्यांना माहिती आहे की, डॉ. शिंगणे यांनी आपल्यासाठी, आपल्या गावांसाठी या संपूर्ण कार्यकाळात काय दिले. त्यामुळे विरोधकांच्या अपप्रचाराला त्याच पद्धतीने उत्तर देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
हा मतदारसंघ डॉ. शिंगणे (Dr. Rajendra Shingane) यांच्या नावावर विश्वास ठेवणार आहे.सर्व धर्म, सर्व जातीच्या लोकांना सोबत घेवून त्यांनी समाज समरस तेची मोट बांधली आहे.त्यांनी जोडलेली माणसं आणि या मतदारसंघातील मतदार यांच्या मतदानरुपी विश्वासावर डॉ. राजेंद्र शिंगणे सहाव्यांदा आमदार होऊन या राज्याचे मंत्री म्हणून या जिल्ह्याचे नेतृत्व करतील, असा विश्वास त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. यावेळी मतदारसंघातील पदाधिकारी, महाविकास आघाडीचे पदाधिकारी,राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.