धम्मदेस विपश्यना केंद्राच्या पत्रकार परिषदेत डॉ. संग्राम जोंधळे यांची माहिती
हिंगोली (Dr. Sangram Jondhale) : संपूर्ण विश्वात सुख शांतीची गरज असते. जगामध्ये १५६ देशांच्या आनंदी राष्ट्रात आपल्या भारताचा १२६ वा क्रमांक आहे. आपल्याकडे बहुतांशी तणावग्रस्त, चिंताग्रस्त नागरिकांची संख्या वाढलेली असल्याची माहिती आचार्य डॉ. संग्राम जोंधळे (Dr. Sangram Jondhale) यांनी धम्मदेस विपश्यना केंद्राच्यावतीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
१३ ऑक्टोंबर रोजी शासकीय विश्रामगृहावर धम्मदेस विपश्यना केंद्राच्या अनुषंगाने पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी आचार्य डॉ. संग्राम जोंधळे (Dr. Sangram Jondhale) यांनी माहिती सांगितली की, भारतात २०० हून अधिक विपश्यना केंद्र आहेत. या विपश्यना केंद्रात सर्व समाजाचे नागरीक सहभागी होत असतात. संपूर्ण विश्वात सुख व शांतीची गरज आहे. १५६ देशाच्या यादीमध्ये आनंदी राष्ट्रात भारताचा १२६ वा क्रमांक आहे. श्रीलंका, पाकिस्तान, चिन यासह अनेक राष्ट्र आपल्यापुढे आहेत. चिंताग्रस्त व तणावग्रस्त नागरिकांची संख्या अमेरिका, इंग्लडमध्ये यापूर्वी होती तशी अधिक संख्या आपल्या भारतात आहे.
शिल, समाधी, प्रज्ञा हे विपश्यनामध्ये शिकविले जाते. विपश्यना हि विद्या २५०० वर्षापुर्वी गौतम बुध्द यांनी शोधुन काढली, भारतातुन लुप्त झालेली हि विद्या सयाजी उ वा खिन यांच्या प्रेरणेने पुज्य सत्यनारायण गोयनका गुरुजी यांनी ब्रम्हदेशातुन भारतात आनली. इगतपुरी येथे विपश्यना विश्व विद्यापिठ आहे. त्यांच्या मार्गदर्शनात विपश्यनाचे दहा दिवसाचे शिबीर आयोजित केले जाते जे विनामुल्य असतात. हिंगोली येथे असे तीन जिप्सी कॅम्प (तात्पुरते शिबीर) सन २०१० ते २०१६ दरम्यान ओंद्रा, पॉलटेक्नीक कॉलेज हिंगोली, एस.आर.पी. हिंगोली येथे आयोजित करण्यात आले होते.
त्यानंतर हिंगोलीत नियमीत एक दिवसाचे विपश्यना शिबीर आयोजित होत असत सन २०१८ ते २०२२ दरम्यान संतुक पिंपरी येथे डॉ. बगडीया यांच्या फार्म हाऊसवर दहा दिवसाचे २८ शिबीर आयोजित करण्यात आले ज्यात ३७८ पुरुष व ३२१ महिलांनी लाभ घेतला तसेच पिंपरी येथे आनंदी गाव कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. क्षेत्रीय आचार्य चंपालाल खिवंसरा व केंद्रीय आचार्य डॉ. संग्राम जोंधळे यांच्या मार्गदर्शनात सन २०१९ मध्ये हिंगोली जिल्हा विपश्यना समिती नावाने ट्रस्ट रजिष्टर झाले व सन २०२० मध्ये हिंगोली हुन १८ कि.मी. वर चिंचोली ता.जि. हिंगोली येथे ९ एकर २१ गुंठे जमीन विकत घेण्यात आली एप्रिल २०२३ पासुन चिंचोली येथे नियमीत विपश्यना शिबीर सुरु झाले आज पर्यन्त १४ पुरुषांचे व ७ महिलांचे असे २१ शिबीर संपत्र झाले ज्यात २५१ पुरुष व १९९ महिलांनी लाभ घेतला.
सध्या चिंचोली येथे ३० ते ४० साधकांचे शिबीर घेतले जातात. या क्षेत्रामध्ये जवळ पास २००० वृक्ष आहेत अतिशय रमनिय ठिकाण आहे या ठिकाणी भारतातील केरळ, कर्नाटक, आंध्रप्रदेश, उत्तर प्रदेश, पुणे, मुंबई इत्यादी ठिकाणाहुन तसेच विदेशातुन साधक येतात. सदरील शिवीर हि विनामुल्य असतात त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही यासाठी तसेच केंद्राच्या विकासासाठी लागणारा खर्च केवळ जुन्या साधकांनी दिलेल्या शुध्द दानावर चालतो. दर रविवारी जुन्या साधकांसाठी एक दिवसीय शिबीर आयोजित केल्या जाते. सध्या ८ रुम, एक डॉरमेटरी, डायनिंग हॉल, धम्म हॉल, असुन नविन ८ रुमचे काम प्रगतीपथावर आहे. तसेच भविष्यात ५० पुरुष व ५० महिला यांच्यासाठी स्वतंत्र १०० रुम व धम्महॉल, पॅगोडा हि कामे प्रस्तावित आहेत. परीसरातील जास्तीत जास्त लोकांनी या केंद्रामध्ये विपश्यना शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.
शिबीराच्या ऑनलाईन रजिष्ट्रेशन साठी प्ले स्टोअरवर Dhamma. org ॲप व www. vridhamma.org या ठिकाणी नोंदणी करता येते असे आवाहन डॉ. जोंधळे (Dr. Sangram Jondhale) यांनी बोलतांना केले. या पत्रकार परिषदेत खुशालसिंह परेदशी, सुनील देवडा, डॉ.सचिन बगडीया, डॉ.रामदास धांडे, पंजाब हराळ, रघुवीरसिंग मान, न्यायाधिश चेतन तेलगावकर, आर्कीटेक चॅलीकवार, गजानन रणखांब, विशाल हराळ, मनिष कयाल, शिवाजी पवार, ढवळे, नंदकिशोर तोष्णीवाल, राजेश बगडीया आदींची उपस्थिती होती.