हिंगोली (Dr. Santosh Tarfe) : कळमनुरी विधानसभा मतदार संघातून महाविकास आघाडी अंतर्गत शिवसेनेच्या डॉ. संतोष टारफे (Dr. Santosh Tarfe) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यांच्या उमेदवारीनंतर तालुक्यातील शिवसैनिकांनी मोठा जल्लोष केला.
महाविकास आघाडी अंतर्गत कळमनुरी विधानसभेत उमेदवारीसाठी सर्वाधिक स्पर्धा होती. डॉ.संतोष टारफे यांसह बाळासाहेब मगर, अजय उर्फ गोपू पाटील, अजित मगर, डॉ.रमेश मस्के आदींसह इच्छुकांची मोठी यादी होती. दोनच दिवसांपूर्वी कळमनुरीतील सर्व इच्छुकांनी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन उमेदवारी कोणालाही मिळाली तरी सगळे एकदिलाने काम करतील, असे जाहीर केले होते. या पृष्ठभूमिवर डॉ.संतोष टारफे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. डॉ. टारफे (Dr. Santosh Tarfe) हे यापूर्वी कळमनुरीतून काँग्रेसचे आमदार राहिले आहेत. पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन त्यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला होता. आदिवासी समाजाचे राज्यस्तरीय नेते म्हणून त्यांची ओळख आहे.