भाजपा माजी जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम
परभणी/गंगाखेड (Dr. Subhash Kadam) : भाजपाचा उमेदवार गगाखेड विधानसभा निवडणुकीत नाही ही बाब अत्यंत दुःखद आणि वेदनादायक असल्याचे सांगत वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाचे अनुपालन करून गंगाखेड विधानसभेची निवडणूक लढविणार नाही व कोणत्याही उमेदवाराचा प्रचार करणार नाही अशी भूमिका भाजपाचे लोकसंभा समन्वयक तथा माजी जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम (Dr. Subhash Kadam) यांनी सोमवार रोजी आयोजीत केलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांशी बोलतांना विषद केली.
गंगाखेड विधानसभा निवडणूक भाजपाच्या चिन्हावर अथवा अपक्ष लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या भाजपाचे लोकसभा समन्वयक तथा माजी जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम (Dr. Subhash Kadam) यांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी नाकारल्याने व संघातील वरिष्ठांनी दिलेल्या आदेशामुळे त्यांच्या आदेशाचे अनुपालन करत ही निवडणूक लढविणार नसल्याचे सांगत गंगाखेड विधानसभा मतदार संघात भाजपाचा उमेदवार नाही ही बाब अत्यंत दुःखद आणि वेदनादायक असल्याचे सांगून या निवडणुकीत कोणत्याही उमेदवाराचा प्रचार करणार नसल्याचे डॉ. सुभाष कदम यांनी सांगितले.
यावेळी भारतीय किसान मोर्चाचे माधवराव चव्हाण, नामदेवराव जाधव, भागवत कदम, भाजपा माजी तालुकाध्यक्ष तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य कृष्णाजी सोळंके, शहर सरचिटणीस संघमित्र गायकवाड, अशोक कदम, रामकर्ण अप्पा जवळेकर, लक्ष्मण देवाकते, ईश्वर पवार, भारत जाधव, शैलेश चव्हाण, उमेश पवार, माऊली कदम, विठ्ठल जाधव, बालासाहेब कदम, खुशाल परतवाघ आदींची उपस्थिती होती.