औंढा नागनाथ (Aundha Nagnath Bus Station) : येथील भारतातील आठवे ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ असलेल्या एसटी बस स्थानक मध्ये एसटी महामंडळाचा सर्वच बसेला प्रवाशाकडून प्रतिसाद मिळत आहे. परंतु एसटी महामंडळ कडून प्रवाशासाठी म्हणावा तसा सुविधा मिळत नाहीत त्यामुळे प्रवासी नाराजी व्यक्त करू लागले आहेत. फेब्रुवारी महिना उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. त्यामुळे सध्या बाराशिव यात्रा चालू आहे. त्यानिमित्त प्रवाशाची येण्या जाण्यासाठी तसेच, मोठ्या शहराकडे जाण्यासाठी एसटी बस मध्ये मोठ्या प्रवाशाची गर्दी होत आहे.
परंतु बस स्थानक मध्ये पिण्याच्या टाकीच्या नळाला पाणीच नाही त्यामुळे प्रवासाची भटकंती होत आहे. विशेष येथे दहा दिवसांवर महाशिवरात्र यात्रा जवळ आली आहे त्यामुळे प्रवाशाची नागनाथाच्या दर्शनासाठी गर्दी होणार आहे. मागील एक महिन्यापासून उन्हाची तीव्रता वाढली असून (Aundha Nagnath Bus Station) पिण्याच्या पाण्यासाठी प्रवाशांना आजूबाजूच्या हॉटेलमध्ये जाऊन पाणी विकत घ्यावे लागत आहे. परिणामी प्रवाशांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. त्यामुळे वेळीच एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने लक्ष देऊन प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी प्रवाशातून होत आहे.