Hingoli:- हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक श्री जी श्रीधर यांनी शहरांमध्ये रात्रीच्या सुमारास दारू पिऊन भरधाव वेगात बुलेट चालवणे, मोटरसायकल चालवणे, फोर व्हीलर चालविणाऱ्या विरोधात कारवाई करण्याचे सूचना दिल्या आहेत.
त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शहरात पेट्रोलिंग (Patrolling)करीत असताना हिंगोली शहरातील जिल्हा परिषद(Zilla Parishad) रस्ता व महाराजा अग्रेशन चौकात वैभव मारुती मगर राहणार सावरखेडा तालुका जिल्हा हिंगोली, गजानन उकंडी टोम्पे राहणार कारवाडी हिंगोली हे आपल्या ताब्यात नंबर नसलेली टू ट्वेन्टी पल्सर व पॅशन प्रो मोटरसायकल भरधाव वेगात चालवताना मिळून आले. त्यांला ताब्यात घेतले असता त्यांच्या तोंडाचा उग्र वास (Bad breath) येत असल्यामुळे त्याची कायदेशीर तपासणी करून पोलीस स्टेशन हिंगोली शहर येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
तसेच यानंतर सुद्धा सदर मोहीम चालू असणार असून वाहन चालकांनी दारू (Alcohol) पिऊन भरधाव वेगात वाहने चालवू नये, अन्यथा पोलिसातर्फे कठोर कार्यवाही करण्यात येईल असे पोलिसातर्फे आवाहन करण्यात आले आहे. ही कार्यवाही जिल्हा पोलिस अधीक्षक जी श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे, पोलीस अंमलदार नितीन गोरे, हरिभाऊ गुंजकर, नरेंद्र साळवे, आजम प्यारेवाले, शहर वाहतूक शाखेचे बंडू घुगे यांच्या पथकाने केली.