Colombia:- कोलंबियातील बंडखोर गट रिव्होल्युशनरी(Revolutionary) आर्म्ड फोर्सेसने फुटबॉल मैदानावर हल्ला केला आहे. दक्षिण-पश्चिम कोलंबियातील एका फुटबॉल(Football) मैदानावर ड्रोनने हल्ला करण्यात आला, या हल्ल्यात दहा जणांचा मृत्यू झाला, मृतांमध्ये एका अल्पवयीनाचाही समावेश आहे.
रिव्होल्युशनरी आर्म्ड फोर्सेसने एकापाठोपाठ एक असे 13 हल्ले ड्रोनच्या मदतीने केले
कोलंबियातील बंडखोर गट रिव्होल्युशनरी आर्म्ड फोर्सेसने फुटबॉल मैदानावर हल्ला केल्याचे वृत्त आहे. कॉका येथील आर्मी स्पेसिफिक कमांडचे प्रमुख जनरल फेडेरिको मेजिया यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, मंगळवारी मुले मैदानावर(Ground) खेळत होती. दरम्यान, रिव्होल्युशनरी आर्म्ड फोर्सेसने एकापाठोपाठ एक असे 13 हल्ले ड्रोनच्या मदतीने केले आहेत. जनरल फेडेरिको मेजिया यांनी सांगितले की, कोलंबिया वेळेनुसार रात्री नऊच्या सुमारास फुटबॉल मैदानावर हल्ला झाला.