मुंबई(Mumbai):- मुंबईला लागून असलेल्या काशिमीरा पोलिसांनी 327 कोटी रुपयांच्या ड्रग्जसह चार पिस्तुलेही जप्त केली आहेत. या प्रकरणी पोलिसांनी तेलंगणा, गुजरात, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील विविध ठिकाणांहून 15 जणांना अटक केली आहे.
हे ड्रग्स रॅकेट कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या सूचने वरून चालत
मीरा भाईंदर-वसई विरारचे पोलीस आयुक्त (Commissioner of Police)मधुकर पांडे यांनी बुधवारी पत्रकारांना सांगितले की, काशिमीरा पोलिसांनी नालासोपारा येथून अभिषेक सिंगला अटक केली असून त्याच्याकडून एमडी ड्रग आणि चार पिस्तुले जप्त केली आहेत. मधुकर पांडे यांनी सांगितले की, अभिषेकची कडक चौकशी केल्यानंतर 15 मे रोजी गुन्हे शाखेने ठाणे घोडबंदर येथून शोएब मेमन आणि निकोलस टायटस यांना 2 कोटी रुपयांच्या ड्रग्जसह(Drugs) अटक केली होती. पुढील तपासात पोलिसांनी दयानंद मुद्दनार आणि बाबा जेनेमिया शेख यांना हैदराबाद येथून तर एका आरोपीला नरसापूर येथून अटक केली. त्यांच्याकडून 20 लाख 60 हजार रुपये किमतीचे 103 ग्रॅम एमडी पावडर, 25 कोटी रुपये किमतीचे 25 किलो रॉ एमडी केमिकल आणि एमडी बनवण्यासाठी लागणारे इतर साहित्य जप्त करण्यात आले.
कारमधून 14 लाख रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त
त्यानंतर दयानंदकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी धनश्याम सरोज आणि मोहम्मद मोईन यांना गोरेगाव, मुंबई येथून अटक केली. मोईनच्या कारमधून 14 लाख रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले. त्यानंतर 27 मे रोजी पोलिसांनी बाबू सिद्धेश जाधव याला ठाण्यातून अटक केली आणि त्याच्या घरातून 53 हजार रुपयांचा ड्रग्ज बनवण्याचा कच्चा माल जप्त करण्यात आला. या आरोपींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी समील डोला यांना मुंबईतून आणि जुल्फिकार उर्फ मुर्तजा कोठारी यांना सुरत येथून अटक करून त्यांच्याकडून 10.84 लाख रुपयांची रोकड जप्त केली. पोलीस आयुक्त मधुकर पांडे म्हणाले की, या आरोपींच्या सांगण्यावरून पोलिसांनी काशिमीरा भागातील एमडी ड्रग बनवण्याचा कारखानाही पाडला होता. या कारखान्यात सुमारे 300 कोटी रुपयांचा एमडी ड्रग्ज बनवण्याचा कच्चा माल(Raw material) जप्त करण्यात आला आहे.
आतापर्यंत 15 आरोपींना अटक
पोलिस आयुक्त पांडे म्हणाले की, दाऊद इब्राहिमच्या (Daaud Ibrahim) प्रेरणेवर समील डोला हा कारखाना चालवत होता आणि अटक आरोपी दाऊदशी थेट बोलायचे, असे आतापर्यंतच्या तपासात समोर आले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असल्याचे मधुकर पांडे यांनी सांगितले. पोलिस आयुक्त मधुकर पांडे म्हणाले की, मे महिन्यापासून सुरू असलेल्या या कारवाईत(action)पोलिसांनी आतापर्यंत 15 आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून चार राज्यांतून 327 कोटी 69 लाख 43 हजार रुपये किमतीचे ड्रग्ज आणि कच्चा माल जप्त केला आहे.