परभणी/गंगाखेड (Parbhani) :- धुलीवंदनाच्या दिवशी रंगोत्सव साजरा करतांना दारू पिऊन मद्यधुंद (Drunk) अवस्थेत वाहन चालविणे काही वाहम धारकांना चांगलेच महागात पडले असुन गंगाखेड पोलिसांनी जागोजागी नाकाबंदी करत तब्बल ३६ जणांविरुद्ध Drunk and Drive ची कार्यवाही केली आहे. दारू पिऊन मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणाऱ्याविरुद्ध पोलीस कार्यवाही करत असल्याची कुणकुण लागताच कार्यवाहीचा ससेमिरा टाळण्यासाठी अनेक वाहन धारकांनी चोर वाटेने आपली वाहने वळविल्याची चर्चा होत आहे.
धुलीवंदनाच्या दिवशी दारू पिऊन वाहन चालवितांना कोणी आढळले तर ड्रॅंक अँड ड्राइव्हची कार्यवाही करण्याचा इशारा
दुचाकी असो वा चारचाकी या वाहनाचे मालक सर्रासपणे दारू पिऊन वाहन चालवित असल्यामुळे अपघाताच्या घटनांत दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत असुन या अपघातात (Accident) अनेक दुचाकी वाहन धारकांना तसेच इतरांना ही आपला जिव गमावावा लागत आहे. वाढत्या अपघाताच्या घटनां टाळण्यासाठी गंगाखेड पोलीस ठाण्याचे प्रभारी परिविक्षाधीन पो. अ. ऋषिकेश शिंदे यांनी दारू (Alcohol) पिऊन मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणाऱ्या दुचाकी, चार चाकी तसेच अन्य वाहन चालकांविरुद्ध विशेष मोहीम हाती घेत धुलीवंदनाच्या दिवशी दारू पिऊन वाहन चालवितांना कोणी आढळले तर ड्रॅंक अँड ड्राइव्हची कार्यवाही करण्याचा इशारा शांतता समितीच्या बैठकीत बोलतांना दिला होता.
दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या मद्यधुंद अवस्थेतील सुमारे ३६ जणांविरुद्ध ड्रॅंक अँड ड्राइव्हची केली कार्यवाही
शुक्रवार १४ मार्च रोजी धुलीवंदनाच्या दिवशी अनेक वाहन धारक अंमली पदार्थाचे सेवन करून मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवित असल्याचे निर्दर्शनास येताच गंगाखेड पोलीस ठाण्याचे प्रभारी परिविक्षाधीन पो. अ. ऋषिकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि आदित्य लोणीकर, सपोनि शिवाजी सिंगनवाड, पोलीस उपनिरीक्षक व्यंकट गंगलवाड, पोलीस उपनिरीक्षक राहुल लोखंडे, वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वैजनाथ आदोडे, पो. शि. सुनिल मामीलवाड, गव्हाणे आदींच्या पथकाने परभणी रस्त्यावरील संत जनाबाई मंदिर प्रवेशद्वार कमान, महाराणा प्रताप चौक परळी नाका, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, दिलकश चौक, दत्त मंदिर चौक परिसर आदी भागात नाकाबंदी करून दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या मद्यधुंद अवस्थेतील सुमारे ३६ जणांविरुद्ध ड्रॅंक अँड ड्राइव्हची कार्यवाही केली. गंगाखेड पोलिसांनी हाती घेतलेल्या या मोहिमेमुळे मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणाऱ्या चालकांची चांगलीच धावपळ उडाली होती. पोलीस कार्यवाहीचा ससेमीरा टाळण्यासाठी असंख्य मद्यधुंद अवस्थेतील वाहन धाराकांनी आपली वाहने चोर वाटेने वळविल्याची चर्चा होतं आहे.