हिंगोली (Hingoli Assembly Elections) : जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवार १८ रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून ते बुधवार दिनांक २० नोव्हेंबर पर्यंत आणि दिनांक २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणीच्या दिवशी कोरडा दिवस (Dry Day) जिल्हाधिकारी अभिनव गोयल (Collector Abhinav Goyal) यांच्याकडून घोषित करण्यात आलेला आहे. सदर काळात जिल्ह्यातील सर्व मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद राहतील.
अवैध मद्य निर्मिती, विक्री, वाहतूक किंवा मद्य वाटप आदी संबंधी माहिती, तक्रार द्यावयाची असल्यास टोल फ्री क्रमांक १८००२३३९९९९ व अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, हिंगोली कार्यालयाच्या ०२४५६- २२०१०६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक आदित्य पवार यांचे वतीने करण्यात आले आहे. निवडणूक मतदान निमित्ताने (Hingoli Assembly Elections) अनेक ठिकाणी अवैध दारू साठा केला जातो. त्यामुळे या गैरप्रकारावर आळा घालण्याकरता राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारूवर प्रतिबंध घालण्यासाठी पथके तैनात केले आहेत कुठेही अवैध दारू साठवणूक केल्याचे निदर्शनास आल्यास त्यांनी याबाबतची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला द्यावी, असेही (Collector Abhinav Goyal) आवाहन करण्यात आले आहे.