मानोरा (Washim) :- डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला येथे आस्थापनेवर कार्यरत होतो. २००१ पुर्वीची वेतन श्रेणी दि. १ ऑक्टोबर १९९४ पासून रुपये १४०० ते २३०० आणि दि. १ जानेवारी १९९६ पासून रुपये ४५०० ते ७००० विद्यापीठाकडून वेतन श्रेणीसह थकबाकी रक्कम अदा करावी या मागणीसाठी मौजे गव्हा येथील ८० वर्षीय जगदीश गोविंदराव देशमुख हे विद्यापीठ अकोला येथील मुख्य प्रवेश द्वारासमोर उपोषणाला बसले आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख विद्यापीठ अकोला चे (Dr. Panjabrao Deshmukh University Akola) कुलसचिव यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, आपल्या विद्यापीठात आस्थापनेवर कार्यरत होतो. २००१ पुर्वीची वेतन श्रेणी मंजुर करून थकबाकी रक्कम देण्यात यावी, यासाठी वेळोवेळी विद्यापीठ याजकडे विनंती करून मागणी केलेली आहे. मात्र न्याय मिळाला नाही. त्यामुळे आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे. असे कळवून विद्यापीठासमोर उपोषणाला प्रारंभ केला आहे.