एमपी जिल्ह्यातून शेकडो मजुर गावा गावात दाखल
देशोन्नती वृत्तसंकलन
चिखली/बुलढाणा ( CM Ladki Behin Yojana) : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री यांनी महिलांसाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. त्यांमध्ये लाडकी बहीण योजनेत (CM Ladki Behin Yojana) तर महिलांना दरमहा दिड हजार रुपये दिल्या जात आहे . त्यामुळे अशा या योजनेमुळे शेतकऱ्यांना शेती कामासाठी महिला मजुरच मिळेने अवघड होवून गेले असल्याने शेतकऱ्यांना सोयाबीन सोंगणीसाठी एम पी मधून मजुर आणून कामे करून घेण्याची वेळ आली आहे.
चिखली तालुक्यामध्ये यावर्षी मेरा महसुल मंडळात पावसाने पाठ फिरवली असल्याने अद्यापही शिवारातील नदी नाले, तलाव, विहीर, बोर मध्ये पाण्याची पातळी वाढली नाही. आणि तापमान दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. त्यामुळे हिरव्या गार असलेली सोयाबिन पिके वाळू लागली आहे. काही शेतातील याबिन पिक हिरवे असून सोंगणीलां आली नाहीत. तर काही शेतातील सोयाबिन पिक सोंगणीला सुरवात करावी लागत आहे.
मात्र गावात सोयाबिन सोगणीसाठी महिला मजूर मिळत नाही जर वेळेवर वाळलेली सोयाबीन सोगणी केली नाही, तर उभी सोयाबिन फुटून मोठे नुकसान होवू शकते. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी एम पी जिल्हयातील शेकडो आणून सोंगणीचा हंगामास सुरुवात केली आहे. (CM Ladki Behin Yojana) एकीकडे मजुर गावातच मजुरीचे काम मिळावे, यासाठी मागणी करतात मात्र आता सरकारने महिलांसाठी विविध योजना सुरू केल्याने शेतकऱ्यांना शेती कामासाठी महिला मजूर मिळणे अवघड होवून गेले आहे हे मात्र खरे!