चिखली (Buldhana):- वाळू माफियांवरील(Sand Mafia) राजकीय वरदहस्त व त्यांच्या असलेल्या लागेबांध्यांमुळे त्यांच्या अवैध वाळू(Illegal sand) वाहतूकीला चांगलेच दिवस आले आहेत. परंतु त्यातूनच कोणीतरी अधिकारी आपला पाठलाग करत आहे हे पाहून एका टिप्पर चालकाने मुरादपुर फाट्यालगत हायवे रोडवरच अवैध रेती टाकून पसार होवून गेला त्यामुळे रोडवर पसरलेल्या रेतीवर वाहने स्लिप होवून अपघात होत असल्याने वाळू माफिया मुळे निष्पाप वाहन चालकांवर आपले प्राण गमावण्याची वेळ आली आहे.
वाळू माफिया कडून नदी पात्रातून रात्रीला मोठया प्रमाणावर अवैध वाळू उपसा सुरू
खडकपूर्णा नदी पात्रातील रेतीचा लीलाव गेल्या दोन वर्षांपासून स्थगित असल्याच्या नावाखाली वाळू माफिया कडून नदी पात्रातून रात्रीला मोठया प्रमाणावर अवैध वाळू उपसा सुरू असल्याने वाळू माफिया रेतीची विविध ठिकाणी रेतीची साठवणूक करुण ठेवत आहेत. तर गावोगावी रेतीची अवैध वाहतूक करुण बांधकाम करण्यासाठी अव्वाच्या सव्वा भावाने रेतीची विक्री केली जात आहे . त्यामुळे रात्रीला वाळू माफियांना दिवस उजाडत असल्याने रात्रभर टिप्पर (Tipper)चालक भरधाव वेगाने रेतीची वाहतूक करतात. अनेकवेळा सरपंच व ग्रामस्थ अवैध वाहतूक(Illegal traffic) थांबवून संबधीत विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन लावून कळवितात परंतु वाळू माफियावर राजकीय व काही शासकिय अधिकाऱ्यांच्या लागेबांधयांमुळे त्यांच्यावर कारवाई करण्यास अधिकारी कचरत आहेत.
नागरिकांच्या ओरडण्यामुळे नाइलाजास्तव अधिकारी थातूर मातुर कारवाई
वाळू माफिया गावातून भरधाव वेगाने वाहने चालविण्यातही मागे-पुढे पाहत नाहीत. या बाबतीत काही वेळा नागरिकांच्या ओरडण्यामुळे नाइलाजास्तव अधिकारी थातूर मातुर कारवाई करत असल्याने दिसून येत आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षां पासून वाळू माफियांची चांगलीच मुजोरी वाढली आहे या धंद्यात मिळणाऱ्या प्रचंड पैशामुळे ते अल्पावधीत श्रीमंतीची चव चाखत असल्याने अनेक गैरप्रकार केले जात आहेत. परंतु गेल्या तीन दिवसापूर्वी रात्रीला एका टिप्पर चालकाचा अधिकारी पाठलाग करत असतांना वाहन चालकाने गाडी पकडणार म्हणून भरधाव वेगात गाडी चालून भर रोडवरच टिप्पर मधील अवैध रेती हायवे रोडवरील मुरादपुर फाट्या लगत रोडवर खाली करूण पसार झाला. त्यामुळे रोडवर पडलेल्या रेतीवरून वाहने स्लीप होवून अपघात होवू लागले आहे. त्यांमध्ये झालेल्या अपघातात एका महिलेला आपला जीव (life) गमावावा लागला तर तीन जण जखमी होवून चिखली येथे रुग्णालयात जावून औषध उपचार घेत आहेत .त्यामुळे आता तरी शासन-प्रशासन माफियांना आळा घालणार का, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे. तरी संबंधित अधिकारी यांनी तात्काळ दखल घेवून अवैध वाळू वाहतूकीला लगाम घालून हायवे रोडवरील पडलेल्या रेतीची विल्हेवाट लावावी अशी मागणी होत आहे .
याबाबत चिखली तहसिलदार संतोष काकडे यांना विचारले असता त्यांनी सागितले की अवैध रेती वाहतूक करणारे टिप्पर ज्या ठिकाणी दिसतील त्या ठिकाणी त्यांच्यावर कार्यवाही केली जात आहे. त्यातच हायवे रोडवरील मुरादपुर फाट्या लगत अवैध रेतीमुळे अपघात होत आहेत या बाबतीत संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांना रेतीची विल्हेवाट लावण्यासाठी कळविले आहे.