वैलोचना नदी पडली कोरडी
वैरागड (Maize crops Production) : रब्बी हंगामात नदी लगतचे शेतकरी नदी पात्रात खड्डे खोदून मोटरपंपा द्वारे धान , मका व इतर कडधान्य पिकाला पाणी देत असल्यामुळे तसेच वाढत्या तापमानामुळे येथील वैलोचना नदीपात्र पूर्णपणे कोरडे पडल्यामुळे पाण्याअभावी शेतकर्यांच्या (Maize crops Production) मका पिकाचे उत्पादन घटले.
पारंपारिक शेतीला फाटा देत वैरागड येथील शेतकरी क्रीष्णा मंडळ यांनी किरायाने सात एकर जमीन व हरिदास बिश्वास यांनी किरायाने दोन एकर जमीन घेऊन पहिल्यांदाच (Maize crops Production) मका पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली. सिंचनाच्या सुविधे अभावी शेती लगत असलेल्या वैलोचना नदी पात्रात खड्डे खोदून मोटरपंपा द्वारे मका पिकास पाणी देण्यात येत होते.
वाढते तापमान, रखरखत्या उन्हामुळे आणि नदी लगतचे धान उत्पादक व कडधान्य उत्पादक शेतकरी सुद्धा नदी पात्रात मोटार पंप लावून पिकास पाणी देत असल्यामुळे वैलोचना नदी कोरडी पडून पाण्याअभावी शेतकर्याचे (Maize crops Production) मका पिक करपून उत्पन्न घटले आहे. सध्या मका पिक निघाले असून मजुरांमार्फत मकई काढण्यात येत आहे. नागपूर येथील व्यापार्यास २२.५० रु. किलो दराने मका विक्री करण्यात येईल. ट्रॅक्टर, बिजाई, खत, औषधी , पिकास पाणी, मजूर रोजी व इतर खर्च निघण्याची शक्यता शेतकर्यांनी व्यक्त केली आहे.